मराठवाडा शिक्षक संघाच्या नूतन केंद्र कार्यकारिणीत कंधार येथिल गोविंद कौंसल्ये यांची सदस्यपदी निवड

नांदेड / प्रतिनिधी

मराठवाडा शिक्षक संघाची नुकतीच बिड येथे केंद्रीय कार्यकारिणी बैठक संपन्न झाली त्यात मराठवाडा अध्यक्ष म्हणून नांदेडचे भुमिपूत्र सूर्यकांत विश्वासराव तर कंधार येथिल कै गणपतराव मोरे विद्यालयाचे मुख्याध्यापक गोविंदराव पुंडलीकराव पाटील कौंसल्ये यांची सदस्य म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली.

बीड येथील भगवान विद्यालयातील डी.टी. नागरे सभागृहात मराठवाडा शिक्षक संघाची सर्वसाधारण सभा संघटनेचे माजी अध्यक्ष पी. एस. घाडगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

गेल्या दहा वर्षापासून गोविंद कौशल्ये हे या संघटनेत नांदेड जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम केले त्यांच्या कार्याची दखल घेऊन गोविंदराव पुंडलीकराव पाटील कौंसल्ये यांची मराठवाडा शिक्षक संघाच्या नूतन केंद्र कार्यकारिणीत स्थान मिळाले आहे.

सर्व प्रथम मराठवाडा शिक्षक संघाचे नेते दिवंगत भा. वा. सानप यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी मराठवाडा शिक्षक संघाच्या मावळत्या कार्यकारिणीने नूतन कार्यकारिणीचा प्रस्ताव ठेवला. त्यास सर्वसाधारण सभेने एकमुखाने मान्यता दिली.

त्यानंतर लगेचच नूतन कार्यकारिणीची बैठक होऊन पदाधिकारी ‘ निवडण्यात आले. उपाध्यक्ष म्हणून ज्ञानोबा वरवट्टे,
एस. जी. गुट्टे, जी. डी. पोले, कोषाध्यक्ष पदी औताडे ए.बी, सरचिटणीस पदी राजकुमार कदम, सहसचिव पदी टी. जी. पवार, एन. जी. माळी तर केंद्र कार्यकारिणी सदस्य म्हणून अशोक मस्कले, बंडू आघाव, मधुकर जोंधळे, रातोळे जी.जी, कुरेशी ए. ए. राठोड पी. आर, सूर्यवंशी आर. एन, कदम व्ही. जी, कौंसल्ये जी.पी, पाटोदेकर ए. डी, सोळंके एन.टी, वऱ्हाड बी.ए. तिर्थकर एस.एस, जमादार एफ. जी, पाटील डी.एस, पाटील पी. एस. यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

महिला प्रतिनिधी म्हणून रेखा सोळुंके यांना कार्यकारिणीवर घेण्यात आले. यावेळी नव्या जुन्याचा मेळ घालण्यासाठी संघटनेचे मावळते अध्यक्ष पी.एस. घाडगे, सरचिटणीस व्ही. जी. पवार आणि जे. एम. सय्यद यांचे मार्गदर्शक मंडळ निवडण्यात आले.

येऊ घातलेल्या औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघाचा मराठवाडा शिक्षक संघाचा उमेदवार ठरविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. यासाठी पी. एस. घाडगे, व्ही. जी. पवार आणि सांगळे बी. टी. यांची निवड समिती निवडण्यात आली.

यावेळी मराठवाडा शिक्षक संघाच्या नूतन कार्यकारिणीचा सत्कार करण्यात आला. भगवान विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष गो. गो. मिसाळ यांनी सर्वसाधारण सभेसाठी विद्यालय उपलब्ध करून दिले तर शाळेचे मुख्याध्यापक अशोक मिसाळ, उपमुख्याध्यापक वासुदेव येवले, पर्यवेक्षक एस.एम. बडे यांनी चोख व्यवस्था केली.

बीड मराठवाडा शिक्षक संघाचे कालिदास धपाटे, गणेश आजबे, युवराज मुरूमकर, विनोद सवासे, सुनील नागरगोजे, मधुकर चौरे, पुरुषोत्तम येडे पाटील, शारेख बेग, घोडके एस.जे, नदीम सर, परवेझ कादरी, विश्वनाथ जाधव, प्रभाकर उंबरे, रमाकांत शेळके यांनी सर्वसाधारण सभा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *