कंधार ;
कंधार हि राष्ट्रकूट कालीन राजधानी होती.
महाराष्ट्रातील सांस्कृतिक,सामाजिक,राजकीय क्षेत्रातील मानाचे पान हे कंधार होतं…
मात्र तदनंतर राजकीय दुर्लक्षित पणा मुळे राजकीय लोकांचे बरं झालं मात्र इथल्या मन्याडी मर्दाना जीवन जगण्यासाठी रोजचा संघर्ष करावा लागतोय हे सत्य जरी असलं तरी शेवटी मण्याडी स्वाभिमानी बाणा जागृत ठेवून येथील माणसांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली यापैकी एक बालाजी किवंडे.
बालाजी किवंडे यांची कन्या पूजा किवंडे या भगिनींनी कंधार च्या इतिहासात मानाचं पान निर्माण केलं आहे.
ग्रामीण भागात उदरनिर्वाह करण्यासाठी काहीही पर्याय नसल्यामुळे बालाजी मामा हे कुटुंब प्रमुख म्हणून कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी कंधार शहरात आले जसे जमेल तसं भेटेल तसं काम करून कुटुंबाचा गाडा पुढे नेण्याचे काम त्यांनी केलेले आहे.
हे सर्व करत असताना त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये आलेले जीवन आपल्या लेकरांच्या आयुष्यात,पदरात पडू नये म्हणून त्यांनी एक वेळ उपाशीपोटी राहून लेकरांना शिकविण्याचा निर्धार केला. बालाजी मामा यांस तिन्ही मुली पण यांनी संकुचित विचार न करता मुलींना शिक्षण दिले त्यापैकी एक म्हणजे पूजा ..
पूजा ने परिस्थितीची जाणीव ठेवून कुटुंबांचे होणारे हाल,अपेष्टा पहात पहात स्वतःसह,वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आणि आता ती भारतीय सैन्यामध्ये सेवा करणार आहे.
शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या माझ्या अनेक भगिनींसाठी निश्चितच पूजा ही प्रेरणादायी ठरेल.
नुकताच पूजा हिने भारतीय सीमा सुरक्षा दलाचे(B.S.F) प्रशिक्षण घेऊन मन्याडी खोऱ्यात आली आहे तिचे तिच्या कुटुंबाचे सहर्ष स्वागत अभिनंदन पुढील देशसेवेसाठी खूप खूप शुभेच्छा..
पूजा तुझे सर्व आयुष्य प्रत्येक मुलीसाठी प्रेरणादायी ठरो हीच सदिच्छा