नांदेड
एसटी महामंडळाला २० आॅगस्ट रोजी आंतरजिल्हा वाहतूकीची परवानगी मिळाल्यानंतर पहिल्याच दिवशी आगाराला जवळपास सहा लाखाचे उत्पन्न झाल्याची माहिती विभागीय नियंत्रक अधिकारी यांनी दिली.
जिल्ह्यातील विविध एसटी आगारातून २०० बसेसच्या प्रवासाचे नियोजन करण्यात आले होते. या दरम्यान नियमित १८३ बसेसच्या ७९३ फेऱ्या पूर्ण झाल्या. लांब पल्ल्याच्या गाड्यांचे उत्पन्न वगळता पाच लाख ९१ हजार नऊशे शहाण्णव रुपये उत्पन्न मिळाले आहे.
लाॅकडाऊनच्या काळात जिल्हांतर्गत वाहतुकीत महामंडळाला तोटाच सहन करावा लागला होता. आता २३ लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या माध्यमातून पहिल्या फेरीचे साडेचार ते पाच लाख रुपये उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे.