माणूसपण हरवत चाललय…?
कालचीच गोष्ट तरोडा नाक्यावर एक वृध्द स्त्री येणा-या जाणा-या लोकांपुढे पदर पसरवून पैसै मागत होती.अंगावर फाटके लूगडे,डोळ्यात आश्रू दाटलेले.मला पाहून म्हणाली,ताई द्या की काहीतरी…
स्कूटी रस्त्याच्या एका कडेला ऊभी करुन पर्स मध्ये सूटे पैसे शोधत होते,पण माझ्याकडे नव्हते…म्हणून मी शेजारी बसलेल्या भाजीवाल्या काकांना पाचशे रुपयाची चिल्लर मागीतली,
त्यांनी लगेच दिली आणि म्हणाले मॅडम त्या मथारीला द्यायल्या का पैसे?हो काय झाले काका?त्यावर ते म्हणाले हीचा पोरगा लय मोठा साहेब हाय,त्यो लेकरबाळ,बायको ला घेऊन कोरोनामूळ गावाकड आलाय,
गावात त्याच या मथारी शिवाय कोणी नाय…नव-याच्या माघारी लय काबाड कष्टकरुन बिचारीन त्याला शिकवल,पण…त्याला जरा बी उपकार नाही तीच?मागच्याचं वर्षी तीला सरकारन घरकूल बांधून दिल होत…आता बी ती लोकांच्या शेतात काम करुन पोट भरत होती
,मातर तिच्या सूनन तिला आमच्या सोबत राहू नको म्हणून घरातून बाहेर काढल,ती लय मोठ्या घरची लेक हाय म्हणं,तीच्याच बां न याला नौकरकी लावली म्हणत्यात,भाजीवाले काका निराश होउन बोलत होते…या कोरोनान आम्हा हातावरच पोट असणारच पार कंबरड मोडल बघा,दोन येळची भाकर बी नशिबात नाही.
अन हे असले प्रकरण पाहिले की लय राग येतो मातर काय करणार?लेकरांना शिकवण्यासाठी रगत आटवायचं अन हे असे मोठे सायेब झाले की,यायला स्वताच्या जनम दिलेल्या मायीची लाज वाटती,थू अश्या लेकरायच्या जींदगाणीवर,काय फायदा असला साहेब होऊन .
मी पर्स मधून पैसे काढून त्या आज्जीच्या हातात ठेवले,हूंदका आवरत त्यांनी ते पैसे कमरेच्या पिशवीत ठेवले…माझ्याजवळ पेढ्याचा बाॅक्स होता त्याच्या हातात ठेवला,त्यांनी तो अधाश्यासारखा फोडून त्यातले पेढे खाल्ले,आमच्याकडे पाहात पाहात त्या निघून गेल्या..
त्यांच्या पाठमो-या आकृतीकडे पाहातांना मनात असंख्य प्रश्न थैमान घालत होते.खरचं…या कोरोनानं माणसातल माणूसपण हिरावलं का?शहरात राहाणारा त्यांचा मूलगा,केवळ कोरोनाच्या धास्तीन गावाकड परतला?म्हाता-या सासूची अडचण होते म्हणून तिला तीच्या सूनेने चक्क घराबाहेर काढले?आज ती म्हातारी वृध्द स्त्री भिक मागून आपली ऊपजीवीका भागवत आहे,घर असून ती रस्त्यावर आली आहे…!
याला जबाबदार कोण?सध्याची स्थिती की,त्यांच्या सून आणि मूलाची मानसिक स्थिती?आज कोरोनाच्या विषाणूमूळे अख्खे जग घरात बंदिस्त आहे,आपल्याला आणि आपल्या कुंटूंबाला कोरोना होऊ नये म्हणून सर्वजण काळजी घेत आहेत
आणि एकीकडे काहीजण अडगळ म्हणूम म्हाता-या आईला घराबाहेर काढत आहेत.हीच मोठी शोकांतीका आहे.कोरोना तू आलास आणि आम्ही माणसातल माणूसपण हरवून बसलोय की काय,अस वाटायला लागलय?
रुपाली वागरे/वैद्य नांदेड
९८६०२७६२४१