परफेक्ट इंग्लीश स्कूल पेठवडज या शाळेस ” मेस्टाचा ” राज्यस्तरीय पुरस्कार

कंधार

मेस्टा राज्यस्तरीय अधिवेशन 2022 परफेक्ट म्हणजेच परफेक्टच
परफेक्ट इंग्लीश स्कूल पेठवडज ता कंधार जिल्हा नांदेड या शाळेने आतापर्यंत ग्रामीण भागात सातत्याने गुणवत्ता पुर्ण नवोदयसाठी पात्र 58 विद्यार्थी, राष्ट्रीय सैनिक स्कुलसाठी 27 विद्यार्थी निवड,स्काॅलरशीप परीक्षेत शिष्यवृत्तीधारक 142 विद्यार्थी व स्पर्धा परीक्षा चा परफेक्ट निकाल देणारी शाळा म्हणुन Best School Award Perfect Primary English School Nanded मुंबई येथे मेस्टा चे राज्यस्तरीय अधिवेशनात हा पुरस्कार देण्यात आला आहे .

या अधिवेशनासाठी खास करून ऑस्ट्रेलिया वरून आलेले प्रमुख पाहुणे श्री. एलन बलगाईच ( एज्युकेशन डारेक्टर ऑस्ट्रेलिया ) व श्रीमती. जुनीता हेली ( स्ट्रेटेजिक पॉलिसी व करिक्युलम डायरेक्टर ऑस्ट्रेलिया ) यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला आहे.

या पुरस्कारांचे सर्व श्रेय परफेक्ट शाळेचे सचिव गोविंदराव केंद्रे , मुख्याध्यापिका सौ.अनुराधा पवार मॅडम व परफेक्ट शिक्षकांना, तसेच सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना आणि सतत पाल्यांना पाठिंबा देणाऱ्या ग्रामिण भागातील पालकांना जाते.

थोडक्यात माहिती ;

संस्थेचे नाव:- भगवान बाबा शिक्षण प्रसारक मंडळ देवईचीवाडी ता. कंधार जि. नांदेड
शाळेचे नाव :- परफेक्ट प्रायमरी इंग्लिश स्कूल पेठवडज
एकुण वर्ग :- पहिली ते आठवी
एकुण विद्यार्थी संख्या :- 445
इमेल :- [email protected]
Mobile No:- 9881501250

सर्वांचे संस्थेच्या वतीने मनापासून अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *