कंधार ; प्रतीनिधी
शिवा संघटना संपूर्ण महाराष्ट्रभर महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती मोठ्या उत्सहाने साजरी करत असते.गेल्या दोन वर्षापासुन देशावर कोरोनाचे संकट असल्यामुळे शासनाने सर्व धार्मिक व सार्वजनिक कार्यक्रमावर निर्बंध लावले होते.यावर्षी कोरोनाचा प्रदुर्भाव कमी झाला आहे.शासनाने सर्व निर्बंध उठवले असल्याने यावर्षी महात्मा बसवेश्वर यांची जयंती धुमधडाक्या साजरी होणार आहे.
कंधार शहरात शिवा संघटनेच्या वतिने 19मे रोजी भव्यदिव्य जयंती काढण्यात येणार असल्याची माहीती शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.मनोहर धोंडे यांनी दिली आहे.
शिवा संघटनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशांमध्ये अक्षय तृतीया पासून पुढे महिनाभर भव्य स्वरूपात गेल्या 22वर्षापासुन जयंती उत्सव साजरा केला जातो त्याअंतर्गत कंधार तालुक्याच्या वतीने कंधार शहरांमध्ये शिवा संघटनेच्या माध्यमातून दिनांक 19 मे रोजी माईच्या मंदिरापासून कंधारच्या बसस्टँड समोरील संत नामदेव महाराजांच्या सभाग्रह पर्यंत मोठी भव्य मिरवणूक काढून समारोप याच सभागृहात केला जाणार आहे .
बैठकीसाठी व महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती उत्सवासाठी तालुक्यातील शिवा संघटनेच्या मावळ्यानी व सर्व समाज बांधवांनी बहुजनांनी उपस्थित राहावं असं नम्र आवाहन प्रा.मानोहर धोंडे यांनी केले आहे.
नांदेड येथिल जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण सोहळा 22एप्रिल रोजी
नांदेड शहरात शिवा संघटनेच्या मागणी नुसार व पाठापुरावा केला असल्याने महानगर पालीकेकडुन दिनांक 22एप्रिल रोजी सायंकाळी 5वाजता जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण सोहळा मोठ्या उत्सवात साजरा होणार आहे.त्यामुळे या सोहळ्याव्याला शिवा संघटनेच्या मावळ्यानी मोठ्या संख्येने उपस्थित राहवे असे अहवान ही प्रा.मनोहर धोंडे यांनी केले आहे.