कमाठा -अंबानगर कॅनॉल रस्ता मजबुतीकरणासह जोडण्यासाठी निधी द्या : पालकमंत्र्यांकडे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे यांची मागणी


नांदेड : विमानतळाच्या विस्तारीकरणामुळे सांगवी बुद्रुक प्रभाग क्रमांक तीन अंतर्गत असलेल्या कामठा ते आंबानगर मार्गावरील रस्ता जोडण्यासाठी डीपीडीसीतून निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे यांनी पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

नांदेड महापालिका हद्दितील प्रभाग क्र. ३ सांगवी बु. अंतर्गत असलेल्या कामठा ते अंबानगर कॅनॉल मार्गावरील रस्ता विमानतळ विस्तारीकरणात गेल्यामुळे धम्मज्योत नगर, गौतम नगर व अंबा नगर नागरीकांची मोठी अडचन होत आहे. परिसरात जवळपास २५ हजार लोकवस्ती आहे. रस्त्या अभावी या भागातील विद्यार्थी, वृध्द नागरिक आणि कामासाठी जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांची मोठी अडचण होत आहे. त्यामुळे या भागातील कॅनॉल रस्त्याची पाहणी करून तरोडा कॅनॉल रस्ता धरतीवर जोडणे आवश्यक आहे.

यासाठी जागा उपलब्ध असून सदरील रस्ता दलित वस्ती सुधार योजनेतून घेता येवू शकतो. त्यामुळे या भागातील नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन या रस्त्यासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे यांनी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे केली आहे. यावेळी आ. बलाजीराव कल्याणकर यांची उपस्थिती होती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *