फुलवळ.
कंधार तालुक्यातील फुलवळ येथे समता नायक जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्त कार्यकारणी निवड समितीची बैठक सार्वजनिक सांस्कृतिक सभागृहात पार पडली.
यावेळी सर्वानुमते परमेश्वर डांगे यांची जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी तर कैलाश फुलवळे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
या बैठकीत समितीच्या पदाधिकार्यांची निवड करण्यात आली असुन सचिव विठ्ठल मंगनाळे, कोषाध्यक्ष रामलींग मठपती, कार्याध्यक्ष शुभम फसमल्ले,तर सल्लागारपदी सूर्यकांत मंगनाळे गंगाधर शेळगावे, यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
यावेळी हिराकांत मंगनाळे, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण पाटील मंगनाळे, ओमकार डांगे, विक्रम मंगनाळे, परमेश्वर शेळगावे, वैजनाथ फुलवळे, ओमकार स्वामी,सचिन मंगनाळे, संजय डांगे,संतोष स्वामी, ग्रामपंचायत सदस्य श्रिकांत मंगनाळे, मनोज शेळगावे, श्रिकांत मंगनाळे तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.