कंधार ; प्रतिनिधी
आम आदमी पार्टीच्या पदाधिकारी यांनी कंधार शहरातील महाराणा प्रताप लोकशाही डॉ.अण्णाभाऊ साठे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज सर्व महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाची प्रस्तावना साईनाथ मळगे यांनी केली तर प्रमुख पाहुणे जिल्हा सचिव डॉ.अवधूत पवार यांनी सखोल मार्गदर्शन केले ते म्हणाले की कंधार तालुका हा क्रांतिभूमी आहे.
आम आदमी पार्टी तालुका कंधारचा नूतन पदाधिकाऱ्यांनी गाव तिथे आम आदमी पार्टी अभियान राबून जनतेला न्याय मिळवून द्यावा असे त्यांनी आवाहन केले .
तसेच फाउंडर मेंबर नरेंद्रसिंग ग्रंथी यांनी पण यावेळी मार्गदर्शन करताना देशातील
सर्वसामान्य माणूस सुद्धा दररोज सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत टॅक्स भरतो त्याच टॅक्स मधून अधिकाऱ्यांना पगार मिळतो त्यामुळे अधिकारी जनतेचे सेवक असल्याचे सांगीतले .
यावेळी कार्यक्रमाला जिल्हा संयोजक नांदेड ज्ञानेश्वर रामदास कदम , उपजिल्हा संयोजक दयानंद कदम , मुंजाजी व्यवहारे , युवा जिल्हा संयोजक अजित पाटील आदीची यावेळी उपस्थिती होती .
आम आदमी पार्टी तालुका कंधार नूतन कार्यकारिणी पुढील प्रमाणे जाहीर करण्यात आली
साईनाथ मळगे ( ता.अध्यक्ष, कंधार),
तिरुपती इंगळे ( ता.उपाध्यक्ष कंधार),
बबन गणेश केंद्रे
(तालुका उपाध्यक्ष कंधार ),
श्यामराव जोंधळे ( ता. उपाध्यक्ष कंधार ),
नितीन गंगाधर जोंधळे ,( ता. सचिव कंधार ),
सनोजकुमार संजय मोरे ( ता. प्रसिद्धीप्रमुख,कंधार ),
मदन जानकीराम मुंडे ( युथ विंग तालुका अध्यक्ष ) ,
संभाजी गणेश वाघमारे (शहर अध्यक्ष, कंधार )
आदीची बिनविरोध निवड करण्यात आली .
या मेळाव्यात पक्षप्रवेश सदस्य म्हणून गंगाधर मोरे ,राम केंद्रे, नामदेव केंद्रे, नारायण गिरी, भीमराव मोरे, बालाजी मोरे, बालाजी भालेराव, पंढरी मोरे , किरण कांबळे , संग्राम वाघमारे,करण मळगे,माधव वाघमारे, विशाल भैले आदिनी पक्ष प्रवेशा केला .