कंधार : प्रतिनिधी
नांदेड लोकसभेचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर व लातूर लोकसभेचे खासदार सुधाकर शृंगारे यांच्या नावे खासदार चषक २०२२ चे आयोजन जिल्हा परिषद सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या वतीने क्रीडा संकुल क्रीडांगण नवरंगपूरा ता कंधार येथील मैदानात करण्यात आलेले आहे प्रथम पारितोषिक दोन लक्ष रुपये, द्वितीय पारितोषिक एक लक्ष रुपये, तृतीय पारितोषिक पन्नास हजार रुपये यासह चार लक्ष रुपयाचे बक्षीसे दिले जाणार आहेत,
मराठवाड्यात प्रथमच प्रकाशझोतात डे नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे या क्रिकेट स्पर्धेच्या लोगोचे व भिंती पत्रकाचे विमोचन खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते चिखली ता कंधार येथे करण्यात आले
यावेळी वैधकीय आघाडीचे प्रदेश संयोजक डॉ अजित गोपछेडे,नांदेड मनपा विरोधिपक्षनेते दिपकसिंह रावत,शितल खांडील,अभिषेक सौधे, यांच्या मान्यवरांची उपस्थिती होती,या स्पर्धेत नांदेड जिल्ह्या सह मराठवाड्यातील क्रिकेट संघाने सहभाग घ्यावा असे आव्हान खा चिखलीकर यांच्यावतीने करण्यात आलेले आहे .
मराठवाड्यात प्रथमच होणाऱ्या डे नाईट क्रिकेट स्पर्धेचे उत्सुकता नांदेड जिल्ह्यातील क्रीडाप्रेमी सह खेळाडूं मध्ये निर्माण झालेली आहे या स्पर्धेचे आयोजन समितीचे सदस्य उपनगराध्यक्ष मोहम्मद जफोरोद्दीन बाउद्दीन ,माजी नगरसेवक कृष्णा पापिंनवार , समीर चाऊस ,निलेश गौर ,अड गंगाप्रसाद यन्नावार,साईनाथ कोळगिरे, बंडू पाटील वडजे ,आसिफ शेख यांच्या वतीने या स्पर्धेची जय्यत तयारी चालू आहे.या वेळी शंतनू कैलासे,रवि संगेवार व अँड सागर डोंगरजकर उपस्थित होते.