कंधार / प्रतिनिधी
महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शेकापुर येथील सहशिक्षक व्ही. के केंद्रे ३२ वर्षाचा सेवेनंतर ३० एप्रिल रोजी सेवानिवृत्त झाले.
महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात १९९० मध्ये व्ही. के केंद्रे यांची नियुक्ती झाली. पर्यवेक्षक पदावर कार्यरत होते ३० एप्रिल रोजी ३२ वर्ष सेवा पूर्ण करून ते निवृत्त झाले. संस्था व शाळेच्या वतीने केंद्रे यांचा सत्कार करण्यात आला. महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा सदस्य संभाजीराव पाटील केंद्रे, संस्थेचे सचिव तथा माजी सरपंच शिवाजी केंद्रे, प्राचार्य मोतीराम केंद्रे, मुख्याध्यापक हाजी मोहम्मद अन्सारोद्दीन यांची विशेष उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी क्रीडा विभाग प्रमुख व्यंकट पुरमवार, प्रा. अरूण केदार, प्रा. सूर्यकांतराव गुट्टे, प्रा. देविदास जायभाये, प्रा. गिरीश नागरगोजे, मोहित केंद्रे, एम. एम. शेख, चंद्रकांत पडलवार, प्रा. मोतीराम नागरगोजे, प्रा. गोविंदराव आडे, प्रा. स्वाती रत्नगोले, प्रा. पंकज पाटील, प्रा. हाणमंत भालेराव, अमित लोंड, प्रा. विजय राठोड, किशन ठोंबर, शिवाजी मेंडके, बोराळे महेद्रकुमार, अनिल बोईवार, एस. पी. केंद्रे, शंभू वाघमारे, मुकेश केंद्रे, गणेश केंद्रे, प्रकाश मुंडे, माधव कदम, मधुकर नागरगोजे यांनी प्रयत्न केले.