कंधार
तसेच या निवेदनावर असे नमूद केले की जाचक व अन्यायकारक असा अतिरिक्त सुरक्षा भार रद्द करावा,प्रत्येक महिन्याला प्रत्यक्ष रीडिंग घेऊन त्याप्रमाणेच बिल द्यावे.
वेळेवर बिल देण्यात यावेत अर्थात वीज बिल भरण्यासाठी पुरेसा वेळ उपलब्ध होईल.
महत्वाचे म्हणजे ग्राहकांशी योग्य वर्तन करावे आणि नियमितपणे भरणा करण्यात येणाऱ्याचे 10 टक्के विज बिल भरणा रक्कम माफ करावी असे
वरील सर्व मागण्याचा गंभीरपणे विचार करावा अन्यथा कंधार येथील सर्व नागरिक, महावितरण ग्राहक व आम आदमी पार्टी तालुका कंधार च्या वतीने तीव्र आंदोलन पुकारण्यात येईल याची सर्वस्वी जवाबदारी आपली राहील असा इशारा देण्यात आला आहे.
या निवेदनावर साईनाथ मळगे तालुका संयोजक, श्याम जोंधळे तालुका सहसंयोजक, नितिन भोसीकर सचिव, बबन केंद्रे सहसंयोजक, संभाजी वाघमारे शहर संयोजक आदीच्या स्वाक्षरी आहेत .