शायर सगीर अहेमदखाँ पठाण ; वाढदिवस विशेष.


दैनिक गाववाला कवी – शायर मंचाचे सन्माननीय अध्यक्ष सुप्रसिद्ध कवी – शायर सगीर अहेमदखाँ पठाण यांचा काल दि ११ मे २२ रोजी वाढदिवस होता. तर मंचाचे सन्माननीय कोषाध्यक्ष कवी मदनराव बाबाराव अंभोरे पाटील, सुकळीकर यांचा उद्या दि १३ मे २२ रोजी वाढदिवस आहे. या मित्रद्वयीच्या वाढदिवसानिमित्त दोघांनाही ‘ उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा !दैनिक गाववाला परिवाराचे आभार न मानता त्यांच्या ऋणातंच राहू इच्छितो.


प्रा भगवान कि आमलापुरे


या शुभेच्छापर लेखाच्या सुरुवातीला आजचे बर्थडे जंटलमँन, कवी शायर सगीर अहेमदखाँ पठाण सर आणि कवी मदनराव बाबाराव अंभोरे पाटील, सुकळीकर यांना वाढदिवसाच्या निमित्ताने आभाळभर शुभेच्छा ! दोघांनाही ‘ उदंड आयुष्याच्या अनंत ‘ शुभेच्छा !
ज्यांनी केवळ वसमत आणि परभणीचेच नव्हे तर सबंध मराठवाड्याचेच नाव आणि गाव, ठाव आणि ठीकाणा, अडीअडचणी, विचार आणि भावना, दुष्काळ आणि सुकाळ, सुख – दु:ख, आणि विशेषतः आपले महापुरुषांच्या रुपातील दैवतं आणि मित्रप्रेम आपल्या गात्या गळ्याने, कणखर आवाजात, कवितेच्या माध्यमातून देशभरात नव्हे तर किंबहुना सातासमुद्रापार नेले, किंबहुना मराठी साहित्यात आणि साहित्याच्या इतिहासात अजरामर केले. त्या कविवर्य प्रा डॉ इंद्रजित भालेराव सरांना एकषस्ठी निमित्ताने खूप खूप शुभेच्छा ! सरांना उत्तम निरोगी आयुष्य इच्छितो.


कारणे सांगून तुम्हा सर्वांचा वेळ मी घेणार नाही .पण याक्षणी एवढेच म्हणेल की हा माझा पहिलाच सार्वजनिक वाढदिवस आज साजरा होतो आहे.अर्थातच त्याचा मनोमन आनंद आहेच. शिवाय ,एका विशिष्ट प्रकारच्या ध्येयाने प्रेरित होऊन ,एका निष्ठेने चालणाऱ्या वर्तमानपत्राच्या बँनरखाली म्हणजे ‘ दैनिक गाववाला ‘ या बँनरखाली हा वाढदिवस साजरा होतो आहे. ही बाब माझ्यासाठी जास्त महत्त्वाची आहे.


गत दोन वर्षापासून दै गाववालामध्ये माझी एकही कविता प्रकाशित झाली नाही. तसेच गत दोन वर्षापासून,’ दै गाववाला कवी – शायर मंच ‘ मध्ये पण मी नाही आहे. तरीही आज तुम्ही सर्वानी सगीर पठाण सर आणि मदनराव अंभोरे यांच्या वाढदिवसासोबतच माझा पण वाढदिवस साजरा करण्याचा आणि वाढदिवसाच्या निमित्ताने जे कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे, त्यात भाग घेण्यासाठी उपस्थित राहण्यासाठी .जो गत आठवडाभरात आग्रह आणि अट्टाहास केलात, धरलात.तो लाजबाब आहे.दुसरे म्हणजे हे जसे तुमचे माझ्यावरील प्रेम आहे. तसेच निश्चितणे हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे.तसाच तो एकदा जवळ आलेला माणूस दूर न जाऊ देणारी, या मातीत ती ओल आहे. या मातीचा हा गुणधर्म ,तो ओलावा तुम्हा सर्वांत दिसून येतो आहे. याचेच आणखी एक मोठे आणि दररोजचे उदाहरण म्हणजे आमचे मार्गदर्शक, जेष्ठ साहित्यीक एन डी राठोड सर होत.


दुसरे म्हणजे दै गाववालामध्ये गत दोन वर्षांपासून माझी कविता प्रकाशित झाली नाही. सध्या तरी मी मंचाच्या ग्रुपमध्येही नाही. पण कवी मदनराव अंभोरे सर म्हणाले तसं मी तुम्हा सर्वांच्या ध्यानात आणि मनात आहे ह्यदयात आहे..हे पणया वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सिद्ध झाले आहे. तुमच्या पवित्र ह्यदयात अशीच एक छोटीशी जागा माझ्यासाठी राहू द्यावी. जेणेकरून कविता अधिकाधिक मुकर आणि जीवन अधिकाधिक सुकर होईल.एवढी एक तुम्हा वसमतकर कवींना आणि दै गाववाला परिवारास विनंती करतो.
या अगदी हर्षोउल्हासाच्या प्रसंगी एका कडवट पण सत्य घटनेचा उल्लेख करणे माझ्यासाठी क्रमप्राप्त ठरते. ती घटना म्हणजे सौ अन्नपूर्णा भ आमलापुरेचे मामा आणि आम्हा सर्व फुलवळकरांचे लाडके मेव्हणे, ‘ भावजी ‘ दत्तराव तुकाराम देशमुख, भेंडेगावकर यांचे गतवर्षी म्हणजे २५ एप्रिल २१ रोजी, ऐन जागतिक कोरोना महामारीच्या काळात अगदी लाँकडाउनमध्ये निधन झालं. त्यांना विनम्र अभिवादन !


‘ आम्ही वर्गमित्र, बँच १९९२ – ९३ ‘ या नावाचा,आमच्या दहावीच्या वर्गमित्रांनी एक व्हाट्सएपचा ग्रुप पहिल्या लाँकडाउनच्या दुसऱ्या आठवड्यात तयार केला आहे.पण गत तीन वर्षात एकदा पण त्या ग्रुपमध्ये सुद्धा माझा वाढदिवस साजरा झाला नाही आहे. त्याचे एक कारण असे आहे की त कधीही व्हाट्सएपच्या ग्रुपवर फोटो टाकला नाही.


दुसरे म्हणजे कदाचित माझ्या इतर वर्गमित्रांना माझी जन्मतारीख पण माहीत नसावी. अगदी परवा म्हणजे दि ०६ एप्रिलला आमचे दुसरे वर्गमित्र, एस टी बसचालक माधवराव शेषराव सोमासे यांचा वाढदिवस साजरा झाला.हे मला स्टेट्स पाहून समजले. पण ग्रुपवर त्यांनी फोटो टाकला नाही. म्हणून माझ्यासारखंच त्यांचा वाढदिवस ग्रुपमध्ये साजरा झाला नाही.शिवाय दुसरे वर्गमित्र डॉ टि आर बनसोडे यांचा पण वाढदिवस परवा म्हणजे चार मे रोजी होता. तो पण ग्रुपमध्ये साजरा झाला नाही. असो…..।


सर्व सामान्यतः एक मे ला ध्वजारोहण होते आणि दोन मे पासून शाळा – महाविद्यालयांना सुट्टी जाहीर होते. त्यामुळे थोडे आणि बऱ्याचदा माझी जन्मतारीख कुणाच्याही लक्षात राहत नसावी. तेंव्हा मग आपण काही कोणी महत्त्वाचे व्यक्ती नाहीत म्हणून मी स्वतः कुणालाही सांगत नाही की आज माझा वाढदिवस आहे म्हणून. शिवाय माझ्या गुणदोषाची खातरजमा न करता आपण सर्वांनी माझ्यावर विश्वास दाखविला आणि दुरून डोंगर साजरा.हे अवतरण पण तुम्ही वसमतकर कवी मित्रांनी, विशेषतः दै गाववाला परिवार, कवी आबा पांचाळ, कवी लक्ष्मणसुत काका आणि तुम्ही सर्व कविमित्र,आजचे बर्थडे जंटलमँन सगीर पठाण आणि दुसरे बर्थडे जंटलमँन मदनराव अंभोरे पाटील यांनी सिद्ध केले आहे. त्याबद्दल ह्या सर्वांचे आभार न मानता त्यांच्या ऋणातंच राहू इच्छितो.


स्वतः स मी एक सर्जनशील आणि संवेदनशील कवी म्हणून घेतो.पण तरीही प्रा आनंद कदम यांची माफी मागून आणि त्यांच्या शब्दांत थोडा बदल करून लिहावं वाटतं,
च्यायला या विद्यापीठाच्या
हे काय विद्यापीठ म्हणायचं
भडवं साधा सातवा वेतन आयोग देत नाही
०३ वर्षे पूर्ण झालीत तो लागू होऊन
मग नौकरी करून तर काय करू.


परत एकदा आजच्या दोन्ही बर्थडे जंटलमँनना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! त्यांचे पुढील आयुष्य निरोगी आणि सुखसमाधानाचे जावो. कविवर्य इंद्रजित भालेराव सरांना पण एकषस्ठी निमित्ताने खूप खूप शुभेच्छा ! दै गाववालाचे सर्वेसर्वा आणि आधारवड, संपादक उत्तमराव दगडू काकांना पण निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा ! लेखाच्या शेवटी कवी मदनराव अंभोरे पाटील, सुकळीकर यांची ,’ वाढदिवस ‘ ही कविता सन्मानाने आठवितो आणि थांबतो.


प्रा भगवान कि आमलापुरे
फुलवळ – ९६८९०३१३२८
द्वारे शं गु महाविद्यालय,
धर्मापुरी.ता परळी वै.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *