बंजारा समाजातील पाच महिलांचा तळ्यात बुडून मृत्यू

अहमदपूर ; प्रतिनिधी

14 मे 2022 ची तुळशीराम तांडा तालुका अहमदपूर येथील ही घटना आहे.
मोजमाबाद पांडा आणि रामापूर तांडा तालुका पालम येथील बंजारा समाजाची कुटुंब काम करण्यासाठी अमदपुर तालुक्यातील उजना गावच्या शिवारामध्ये आलेली होती.


तुळशीराम तांडा जवळील तलावांमध्ये सकाळी महिला कपडे धुण्यासाठी गेलेली असताना एकीचा पाय घसरला आणि तिला वाचण्यासाठी बाकी गेलेल्या पाचही महिलांना जलसमाधी मिळाली.
ही दुर्देवी घटना सकाळी साडे आठच्या दरम्यान घडली.
मयत मुली आणि महिलांची नावे
1 राधाबाई धोंडीबा आडे रामपूर तांडा वय 45 वर्ष
2 काजल धोंडीराम आडे वय 19 वर्षे राहणार रामपूर तांडा
3 दीक्षा धोंडिबा आडे वय वर्ष 22 राहणार रामपूर तांडा
4 सुषमा संजय राठोड राहणार मोजमाबाद तांडा तालुका पालम वय 21 वर्ष
5 अरुणा संजय राठोड राहणार मोजमाबाद तांडा वय पंचवीस वर्ष
अशा पद्धतीने मयत महिलांची नावे असून उत्तरीय तपासणीसाठी अहमदपूरच्या शासकीय रुग्णालयामध्ये आणण्यात आलेले आहेत.

पोट भरण्यासाठी आलेल्या बंजारा समाजातील गरीब कुटुंबावर अचानक हा घाला आलेला असून संपूर्ण बंजारा समाजात दुःखाचे डोंगर कोसळले आहे. अमदपुर तालुक्याचे आमदार माननीय बाबासाहेब पाटील साहेब यांनी तात्पुरती मदत म्हणून काही आर्थिक मदत केल्याचे कळाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *