नांदेड :
नांदेड परिक्षेत्रातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा त्यांनी गृहविभागाच्या बैठक घेतला. अधिकाऱ्यांकडून सर्व माहिती समजून घेतली. त्यानंतर दुपारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. नांदेड येथील बांधकाम व्यवसायिक संजय बियाणी यांच्या हत्येचा तपास योग्य दिशेने सुरू आहे.
महाराष्ट्रातील पोलीस तपासासाठी सक्षम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मी बियाणी कुटुंबियांचीही आज भेट घेऊन त्यांचे म्हणणे समजून घेतले. आरोपी विरुद्ध तपास योग्य त्या दिशेने सुरू असून गुन्हेगारांविरुद्ध लवकरच कारवाई केली जाईल असा विश्वास मी त्यांना दिल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. कायदा व सुव्यवस्थेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गुन्हे सिद्धतेचे प्रमाण हे अचूक झाले पाहिजे. याचबरोबर याचे प्रमाणही अधिक वाढले पाहिजे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.