संजय बियाणी यांच्या हत्येचा तपास सीबीआयकडे देण्यात यावा- राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना निवेदन

नांदेड ; प्रतिनिधी

खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आज दि.१४ मे रोजी राज्याचे गृहमंत्री मा.ना.श्री.दिलीप वळसे पाटील साहेब यांची नांदेड येथील शासकीय विश्रामगृह येथे भेट घेऊन संजय बियाणी यांच्या हत्येचा तपास सीबीआयकडे देणे व नांदेड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थे संदर्भात निवेदन दिले.

यावेळी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर , आ.भीमराव केराम, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, भारतीय जनता पार्टीचे महानगर अध्यक्ष प्रवीण साले, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ.संतुकराव हंबर्डे, अनिलसिंह हजारी, मनोज जाधव, डॉ.अमोल ढगे, सोशल मीडिया संयोजक राज यादव, अक्षय अमिलकंठवार यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *