आम आदमी पार्टीचे सदस्य व्हावे  कंधार तालुकाध्यक्ष साईनाथ  मळगे यांचे तरुणांना आवाहन

कंधार ; प्रतिनिधी

आम आदमी पार्टी ची नुतन कार्यकारणी नुकतीच करण्यात आली असून तालुक्यात सदस्य नोंदणी अभिमानात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे  भ्रष्टाचारांची पायेमुळे नष्ट करण्यासाठी व सर्व सामान्य नागरीकांना  भौतिक सुविधा मिळवून देण्यासाठी तालुक्यातील तरुणांनी मोठ्या संखेने क्यूआर कोड द्वारे ऑनलाईन सदस्य नोंदणी करावी असे आवाहन आम आदमी पार्टीचे कंधार तालुकाध्यक्ष साईनाथ मळगे यांनी आज शुक्रवार दि२० मे रोजी केले

आपचा व्हाट्सअप ग्रुप  क्यूआर कोड सर्च करून ग्रुपमध्ये अॅड व्हा व आपलं पूर्ण नाव पत्ता आपला मोबाईल नंबर पाठवा आपली आम आदमी पार्टी मध्ये अधिकृतपणे सदस्य म्हणून नोंद केली जाईल.

येणाऱ्या काळात सर्वसामान्य नागरीकांच्या समस्या सोडविण्यासाठी आपची महत्वाची भुमिका ठरणार असल्याचे  साईनाथ भगवानराव मळगे आप तालुका संयोजक, कंधार यांनी  सांगितले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *