मुखेड ; प्रतिनिधी
मु.पो. इटग्याळ.(प.मु.) ता. मुखेड. जी. नांदेड. येथील रहिवाशी माधव एम सुवर्णकार यांची रक्तदान क्षेत्रात केलेल्या भरीव, अमूल्य कामगिरीमुळे त्यांची “रक्तदाता समन्वयक समिती, नांदेड” जिल्हा समन्वयक पदी निवड करण्यात आली.
माधव एम सुवर्णकार हे जगातील अत्यंत दुर्मिळ रक्तगटाचे रक्तदाता आहेत. बॉम्बे ब्लड ग्रुप हा त्याचा रक्तगट आहे.
आता पर्यंत त्यानीं 55 वेळा रक्तदान केल आहे.
नांदेड मध्येच नसून भारतातील अनेक राज्यात जाऊन त्यानीं रक्तदान केलं आहे.
थोडक्यात. श्रीनगर( j&k) विशाखापट्टणम, झारखंड, रांची, हैद्राबाद, औरंगाबाद, नागपूर, गोंदिया, सांगली, लातूर, नांदेड.
काही ठिकाणी त्यानीं मोटार सायकल वर भर पावसात जाऊन रक्तदान केलं आहे. 1200 ते 1300 इतका प्रवास करून त्यानीं रक्तदान केलेले आहे. त्यांचे हे कार्य अनमोल कवतुकास्पद आहे. त्यांच्या ह्या कार्याची दाखल घेऊन रक्तदाता समन्वय समितीचे संस्थापक अध्यक्ष डि. एम. गायकवाड सर यांनी केली आहे. त्याबद्दल
रमेश डहारे, पूजा अवचट, सुप्रिया अधव, सेजल झोडे, प्रमोद पाटील, एन टी सर बरबडेकर, सचिन कंटेवाड, नितीन सुवर्णकार, लखन रत्नपारखी, सुरेश पाटील, या सर्व रक्तदाता मित्रानं कडून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला.
रक्ताची कुणाला कधी कशी गरज लागेल व कुणाच्या माध्यमातून पूर्ण होईल सांगता येत नाही. यासाठी अधिकाधिक व्यक्तींनी आपल्या जिल्ह्यात ग्रुप मध्ये सहभागी होऊन सेवेचा लाभ घ्यावा व इच्छा असेल तर सदर समाज कार्यात सहभाग घ्यावा असे आव्हान संस्थापक अध्यक्ष डि. एम. गायकवाड सर यांनी केले आहे.