गऊळ ; शंकर तेलंग
गऊळ तालुका कंधार येथील गावात अज्ञात चोरट्यांनी दि.17/ 5/ 2022 या रोजी गावातील भुजंग शिवाजी गिरे हे रात्री अकरा वाजता स्लॅप वर झोपण्यासाठी गेले. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे गर्मी होत होती त्यामुळे सर्व कुटुंब स्लॅप वर झोपी गेले होते. रात्रीच्या सुमारास दोन वाजता. अज्ञात चोरट्याने कपाट फोडून दागिने सोन पैसे, मिळून 1लाख 60 हजार मुद्देमाल चोरट्यांनी पळवले.
तर त्याचं शेजारी घरी नारायण लक्ष्मण गिरी यांचा सुद्धा चोरांनी कपाट फोडून स्लॅप वर झोपलेल्या व्यक्तीचा फायदा घेऊन कपाट फोडून दागिने, सोने, पैसे, अशी मिळून 2लाख 52 हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी पळवला. अज्ञात व्यक्तीवर कंधार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास चालू आहे.
