महात्मा बसवेश्वरांचा इतिहास शासनाच्या पटलावर आणण्यासाठी शिवा संघटनेला जन्म – -प्रा.मनोहर धोंडे

कंधार/प्रतिनिधी

जगतज्योति महात्मा बसवेश्वर यांची आज ८९१ वी जयंती महाराष्ट्रभर शिवा संघटना मोठ्या उत्साहाने साजरी करत आहे.काही ठराविक लोकांनी महात्मा बसवेश्वर यांचा इतिहास अडगळीत टाकला होता.महात्मा बसवेश्वर हे कसे होते हे सुध्दा विरशैव समाज बांधवाना माहीत नव्हते.त्यांचा इतिहास शासनाच्या पटलावर आणण्यासाठी शिवा संघटनेला जन्म घ्यावा लागला,तेंव्हा महात्मा बसवेश्वर जगाला कळाले.समाजाचे काही तथाकथित नेते म्हणून घेणाऱ्यांनी महात्मा बसवेश्वर महाराज व समाजासाठी काय केलं ते सांगावे.शिवा संघटनेच्या प्रयत्नाने सन २००१ साली शासकीय जयंती साजरी केली.तेव्हा या तथाकथित नेत्यांना महात्मा बसवेश्वर यांची जयंती माहित झाली.या अगोदर ही ८७० जयंत्या झाल्या त्यावेळी महाराजांची जयंती साजरी का केली नाही. असा सवाल शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.मनोहर धोंडे यांनी जयंती समारोपाच्या भाषणातुन केला.


कंधार येथे जगतज्योति महात्मा बसवेश्वर यांची ८९१ वी जयंती दिनांक १९ मे रोजी ढोल -ताशाच्या गजरात मोठ्या उत्साहने साजरी करण्यात आली.या जयंतीमध्ये औरंगाबाद येथिल ढोलपथक व तुळजापुर येथिल हलगी पथक आकर्षक ठरले.माईचे मंदिर येथे नारळ फोडुन या मिरणुकीची सुरवात करण्यात आली.गांधी चौक,सराफा लाईन,छत्रपती शिवाजी महाराज चौक,महाराणा प्रताप चौक ते बसस्थानक या मार्गाने ही मिरणुक निघाली.ढोल व हलगीच्या तालावर हजारो तरुणांनी ढुमके लावत ताल धरला.जागोजागी फटाक्याची अतिषबाजी करण्यात आली.संत नामदेव महाराज मंगल कार्यालयात जयंतीचा समारोप करण्यात आला.या समारोप कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.मनोहर धोंडे हे होते तर उदघाटक वैजनाथ तोनसुरे होते

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जि.प.सदस्य ॲड. विजय धोंडगे,विठ्ठल ताकबिडे,स्वागतध्यक्ष शहाजी नळगे, कार्याध्यक्ष बालाजी चुक्कलवाड,बालाप्रसाद मानसपुरे,शिवसेना माजी नगरसेवक गणेश कुंटेवार,मनोहर पा,भोसिकर,बालाप्रसाद भोसिकर ,राॕष्टवादी काँग्रेस पक्षाचे शहरअध्यक्ष राजकुमार केकाटे,मामा मित्र मंडाळाचे अध्यक्ष मामा गायकवाड,दिगबंर मांजरमकर साहित्यिक तथा गायक प्रा.माधव जाधव हे उपस्थित होते.

जयंती समारोप कार्यक्रमात बोलताना प्रा.मनोहर धोंडे म्हणाले की,२८ जानेवारी १९९६ साली शिवा संघटनेची स्थापना झाली.यावेळी महात्मा बसवेश्वर यांची शासकीय जयंती साजरी करावी यासह समाजाच्या आठ मागण्या शासनाकडे करण्यात आल्या.सन२००० साली मुंबई येथिल आझाद मैदानावार दहा हजार समाज बांधवाचा मोर्चा काढण्यात आला.या मोर्चाची दखल घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी आठ ही मागण्या मंजुर केल्या.दिनांक २६ एप्रिल २००१ साली महात्मा बसवेश्वर यांची शासकीय जयंती साजरी करण्याचा जि आर शासनाच्या वतिने काढण्यात आला.महात्मा बसवेश्वर हे कसे दिसतात त्यांचा फोटो उपलब्ध नव्हता तेंव्हा शिवा संघटनेने कर्नाटक येथुन महात्मा बसवेश्वर यांचा फोटो शासनाला भेट दिला.ज्या कर्नाटक महात्मा बसवेश्वर यांचा जन्म झाला असताना ही त्या राज्यात महाराजांची शासकीय जयंती साजरी झाली नाही.महात्मा बसवेश्वर यांची शासकीय जयंती साजरी करणारे महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरलं हे केवळ शिवा संघटनेमुळे सन २००२ साली कर्नाटक तर २००३ साली आंध्रप्रदेश सरकारने शासकीय जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला.शिवा संघटनेच काम हे केवळ लोहा कंधार पुरते मर्यादित नसुन देशात संघटनेच काम मोठ आहे.महाराष्ट्रभर शिवा संघटना जयंती साजरी करत आसते. मात्र लोहा,कंधार तालुक्यातील काही तथाकथित नेते महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीच्या नावावर पैसे जमा करुन धाब्यावर बसत आहेत.हे समाज बांधवानी वेळेतच ओळखले पाहीजे.या तथाकथित नेत्याचं समाजासाठी काही योगदान नाही कुणाच्या तरी सांगण्यावरुन हे सर्व प्रकार चालु आहेत.अशा भामट्यांच्या नादी लागु नका असे अहवान ही यावेळी करण्यात आले.

 जयंती साजरी व यशस्वी करण्यासाठी बालाप्रसाद मानसपुरे,शुभम घोडके,त्र्यंबक पा.भोसीकर,एजास शेख,शिवराज भोसीकर,बाबुराव फासमल्ले,डि.एन.मंगनाळे,प्रा.मंगनाळे आदिसह अनेकांनी परिश्रम घेतले.समारोप कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *