कंधार ;
महात्मा बसेश्वर यांच्या प्रतिमेचे / पुतळ्याचे पूजन संघटनेचे राष्ट्रीय तथा संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे यांच्या हस्ते झाले. जयंतीनिमित्त मिरवणुकीमध्ये सर्वात प्रथम डीजे यावर तरुणांनी व सर्वच समाजातील बांधवांनी मोठ्या उत्साहात महात्मा बसवेश्वर यांचा जयघोष करत मिरवणुकीस प्रारंभ झाला. त्यानंतर तुळजापूरचे हालगी पथक, औरंगाबादचे ढोल पथक, व्हिडिओ गाडी ,भजनी मंडळ, सजीव देखावे व मोठ्या संख्येने सर्वच समाजांतील बांधव व महिला मोठ्या संख्येने सहभागी होती.
जयंती कार्यक्रमाचे अध्यक्ष बहुजनहृदयसम्राट प्रा.मनोहर धोंडे ,राष्ट्रीय अध्यक्ष शिवा संघटना, उद्घाटक वैजनाथ तोंनसुरे राज्य उपाध्यक्ष शिवा संघटना,शिवा कर्मचारी महासंघ राज्य सरचिटणीस विठ्ठलराव ताकबिडे, ॲड. विजय धोंडगे माजी जि . प . सदस्य, स्वागत अध्यक्ष तथा नगराध्यक्ष प्रतिनिधी शहाजी नळगे , शिवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष संभाजी पाटील बुड्डे ,उत्सव समितीचे अध्यक्ष बालाप्रसाद मानसपुरे, शिवा कर्मचारी महासंघ जिल्हाध्यक्ष दिगांबर मांजरमकर, कमिटी कार्याध्यक्ष बालाजी चुकलवाड,नगसेवक गणेश कुंटेवार, बंडू गायकवाड,विद्याथी आघाडी जिल्हाध्यक्ष शुभम घोडके , राष्ट्रवादी युवक राज्य सरचिटणीस बाळाप्रसाद भोसीकर,राष्ट्रवादी काँग्रेस शहर राजकुमार केकाटे , प्रा.डॉ .माधव जाधव, मामा मित्रमंडळ अध्यक्ष मामा गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व शुभेच्छा व्यक्त केल्या शिवा संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अध्यक्ष मनोहर धोंडे सर यांनी सामाजिक कार्याची सविस्तर माहिती आपल्या मनोगतातून व्यक्त केली.कार्यक्रम यशस्वीतेसाठी जी.एस.मंगनाळे,त्र्यंबक भोसीकर, बाबुराव फसमल्ले, एजाज शेख, कपिल नवघरे, मल्लिकार्जुन किडे, परमेश्वर डांगे, साहेबराव राशीवंत, डी एन मंगनाळे, शिवराज भोसिकर, बी एल. अभंगे, माधव भालेराव, एसपी केंद्रे, मोहम्मद सिकंदर, बाबुराव कैलासे,एस.डी.पावडे, व्हि.एस.आमलापुरे, गोपाळ किरपणे, आदींनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा .मंगनाळे तर आभार प्रताप देशमुख यांनी मानले. राष्ट्रगीतांनी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली . सर्वानी महाप्रसाद घेतला .