कंधार ; प्रतिनिधी
दोन वर्षापासुन रखडलेले कंधार तालुक्यातील बिएलओ चे व ग्राम पंचायत निवडणुक कर्मचारी असे सवे मिळून सुमारे आठशे ते नऊशे कर्मचाऱ्यांचे मानधन तात्काळ अदा करावे अशी मागणी आज गुरुवार दि १९ मे रोजी माजी सैनिक संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष बालाजी चुकलवाड यांनी तहसिलदार कंधार यांना निवेदन देवून केली आहे
कंधार तालुक्यातील निवडणुकीत काम केलेल्या कर्मचाऱ्यांचे गेल्या दोन वर्षापासून बि.एल.ओ मानधन तहसिल कार्यालयाकडून संबधीत कर्मचाऱ्यांना आज पर्यंत मिळाले नाही. आणि गेल्या ग्राम पंचायत सार्वजनिक निवडणुकीमध्ये काम केलेल्या 700 ते 800 कर्मचाऱ्यांना (निवडणूकीचे) मानधन मिळाले नाही.
तरी प्रशासनाने आपल्या स्तरावरुन चौकशी करुन त्वरीत कर्मचाऱ्यांना मानधन द्यावे अशी मागणी सैनिक संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष बालाजी चुकलवाड यांनी केली आहे .

