नांदेड/प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासकीय अध्यक्ष विद्याधर अनासकर, माजी मंत्री कमलकिशोर कदम आदी जणांनी राष्ट्रवादी काँग्रेसच पार्टीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांच्या निवासस्थानी नुकतीच भेट दिली. या भेटीदरम्यान महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे विद्याधर अनासकर यांना नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांनी निवेदन देऊन जिल्ह्यामध्ये येणार्या खरीप हंगामात शेतकर्यांना पीककर्जाची गरज आहे. याबद्दल कर्ज देण्यासंदर्भात मागणी केली. त्यामध्ये शेतकर्यांना नवीन सन 2022-23 वर्षांसाठी पीककर्ज द्यावे, सदर पीककर्ज प्राथमिक सेवा संस्थांच्या माध्यमातून शेतकर्यांना वितरीत होणार आहे. जिल्हा बँकेचे संचालक मंडळाने यापुर्वी नियमीत 100 कोटी आणि अतिरिक्त 400 कोटी अशा अल्पमुदतीत फेर कर्जाच्या 500 कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यासाठी 500 कोटींचे पीककर्ज आवश्यक असल्याचे भोसीकर यांनी निवेदनात म्हटले आहे.
यावेळी माजी मंत्री कमल किशोर कदम. माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर. जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर, जिल्हा बँकेचे संचालक मोहन पाटील टाकळीकर, माजी आ. प्रदीप नाईक, जिल्हा सरचिटणीस प्रा. डी.बी. जांभरूणकर, माजी सभापती भगवानराव पाटील आलेगावकर, भाऊसाहेब आलेगावकर. जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अजय कदम आदी जणांची उपस्थिती होती.
जय शिवशंकर कारखान्याची रक्कम द्या
जय शिवशंकर सहकारी साखर कारखाना लि. शेषनगर ता. मुखेड यांना जिल्हा बँकेने पाच कोटी रूपयांचे प्रदीर्घ कर्ज दिले होते. सदर संस्था अवसानात निघल्यामुळे या कारखान्याच्या मालमत्तेचा शासन नियमानुसार लिलाव झाला. मालमत्ता विक्रीतून रक्कम प्राप्त झाली. 3 कोटी 61 लाख 69 हजार या कारखान्याकडे बाकी आहेत. मालमत्ता विक्रीतून आलेली रक्कम जिल्हा बँकेला देण्यात यावी, किंवा एनपीएमध्ये तरतूद करावी आदी स्वरूपातील जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासकीय अध्यक्ष विद्याधर अनासकर यांनी केली आहे.