कंधार प्रतिनिधी
कंधार- घोडज-गगणबीड-बाबुळगाव-हाडोळी (जा.)या मार्गाने बस चालू नसल्यामुळे विद्यार्थीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. विद्यार्थ्याना कंधार येथे शाळा कॉलेजसाठी येण्यासाठी दुसरी कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे त्यांना पायपिट करावे लागते. किंवा खाजगी वाहने विद्यार्थ्यात्याची व नागरिकांची मोठ्या प्रमाणात लुट करत असून त्याची गैरसोय होत आहे. त्यामुळे कंधार घोडज-गगणबिड-बाबुळगाव-हाडोळी (जा.) या मार्गाने बस चालु करा अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने कंधार आगार प्रमुखाना केली आहे
तरी तात्काळ वरील मार्गाने बस सेवा सकाळी ९ वाजता व दुपारी २ वाजता सुरु करावी, अन्यथा संभाजी बिग्रेडच्या वतीने विद्यार्थ्याच्या न्याय हक्कासाठी तिव्र आंदोलन छेडण्यात येईल. यांची गांभीर्याने नोंद घ्यावी. आसे निवेदनाद्वारे आगार व्यवस्थापक यांना कळविले आहे या वेळी उपस्थित मराठा सेवा संघ जिल्हा उपाध्यक्ष बळिराम पाटील पवार व संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष कंधार नितीन पाटील कोकाटे.

