कंधार
कंधार शहरात खासदार प्रताप पाटील चिखलीकर व खासदार सुधाकर श्रंगारे यांच्या संयुक्त विद्यमाने जि प सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या वतीने आयोजित प्रकाश झोतात टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले ,या स्पर्धेत साडे चार लक्षरुपायचे पारितोषिक असल्याने क्रिकेट स्पर्धे कडे सर्वांचे लक्ष लागले आहे तर अंतिम सामना २६ मे रोजी होणार आहे
मराठवाड्यातील पहिल्यांदाच कंधार शहरात नांदेड लोकसभेचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर आणि लातुर लोकसभेचे खासदार सुधाकर श्रंगारे यांच्या संयुक्त विद्यमाने जि प सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या वतीने प्रकाश झोतात टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा दि १५ मे पासून २६ मे २०२२ या कालावधीत मराठवाड्यातील सर्वात मोठ्या खुल्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे,या खासदार चषक २०२२ क्रिकेट स्पर्धे मध्ये प्रथम पारितोषिक २ लक्ष रुपये ,दुसरे पारितोषिक एक लक्ष रुपये, तिसरं पारितोषिक ५० हजार रुपये सह मालिकावीर, उत्कृष्ट गोलंदाज, क्षेत्ररक्षक, भरघोस पारितोषिक असलेल्या क्रिकेट स्पर्धेत या नांदेड जिल्यासह मुंबई, नागपूर, निजामाबाद,लातुर, परभणी, बुलढाणा, अकोला, बोधन,जिंतूर सह राज्यातील मोठमोठे संघांनी एकुण ६४ संघांनी सहभाग घेतला आहे.प्रकाश झोतात खेळवण्यात येत असलेल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा उत्साह पुर्ण वातावरणत अंतिम टप्प्यात आली आहे.खासदार चषकाचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या प्रमाणावर दर्शक उपस्थित राहत आहेत.उत्तम खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी दररोजच्या सामन्यात उत्साहपर भरभरून बक्षीसे देण्यात येत असल्याने खेळाडुमध्ये उत्साह संचारला आहे.
दि २५ मे रोजी उपांत्यफेरी व दि २६ मे रोजी अंतिम सामना होणार आहे ,उपांत्य फेरी मध्ये सेना ईलेव्हन क्रिकेट क्लब मुखेड, सरपंच ईलेव्हन क्रिकेट क्लब बिजेवाडी ता.कंधार,डि टी एच क्रिकेट क्लब कौठा नांदेड,युवा मुबई क्रिकेट संघ मुंबई यांच्यात होणार आहे,दि २६ मे रोजी होणाऱ्या अंतिम सामान्य कडे सर्व क्रीडा प्रमींचे लक्ष लागले आहे या स्पर्धेचे बक्षीस नांदेड लोकसभेचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर व लातुर लोकसभेचे खासदार सुधाकर श्रंगारे यांच्या हस्ते वितरित करण्यात येणार असल्याचे आयोजक प्रवीण पाटिल चिखलीकर यांनी सांगितले,
या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी आयोजन समितीचे उपनगराध्यक्ष जफर बाउद्दीन, माजी नगरसेवक कृष्णा पापिनवार , समीर चाऊस ,भाजपा शहराध्यक्ष गंगाप्रसाद यन्नावार,युवमोर्च्या जिल्हाउपाध्यक्ष निलेश मनोजसिंह गौर,साईनाथ कोळगिरे,आसिफ शेख,बंडू पाटील वडजे, रमण आवाळे ,सय्यद मुजाहिद ,जमीर लाला, सय्यद नदीम ,शेख अफरोज ,समीर खादिम ,अड सागर डोंगरजकर ,प्रवीण बनसोडे, रवी संगेवार, रामदास बाबळे, सुमित गोरे ,शंतनू कैलासे, प्रवीण बनसोडे,गणेश उगले आदीं परिश्रम घेत आहेत, या सामन्यान मध्ये पंच म्हणून भरत चव्हाण ,मोइन सर यांनी चोख भूमिका बजावत आहेतबतर समालोचक अब्दुल हापिज खान ,शंतनु कैलासे ,हे प्रेक्षकांची मने जिंकून घेतली हि स्पर्धा पाहण्यासाठी कंधार पंचक्रोशीतील क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत.