दिव्यांगाच्या प्रश्नावर कानाडोळा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर दिव्यांग हक्क दप्तर दिरंगाई कायद्यानुसार कारवाई करा – चंपतराव डाकोरे पाटिल कूंचेलीकर यांचे निवेदन

कंधार ; प्रतिनिधी

दिव्यांग बांधवांनी न्याय हक्क मिळाला म्हणुन पडत झडत शिष्टमंडळाने गटविकास अधिकारी, तहसिलदार कंधार यांना दिलेल्या निवेदनाची प्रत देऊन चर्चा करून ओं सी घेतली असता चार महिन्यांत रजिस्टर मध्ये नोंद नसल्याने त्यांचे साधे उतर न देणाऱ्या अधिकारी यांच्या वर दिव्यांग हक्क दप्तर दिरंगाई कायद्यानुसार कारवाई करतील काय? स़स्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कूंचेलीकर यांचे निवेदन सादर केले आहे.


नांदेड जिल्यातील दिव्यांगाना त्यांचे हक्क मिळावा म्हणून दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांच्या नेतृत्वाखाली ांदेड जिल्हातील सर्व गटविकास अधिकारी अधिकारी यांना प्रत्यक्ष दि,१५ फ्रेबु २२ ते ५ मार्च२२ पर्यंत शिष्टमंडळाने निवेदनावर चर्चा दिलेल्या प्रश्नाचे लेखी ऊतर 9 मार्च 2022 पर्यंत नाही दिल्यास अनेक प्रकारचे आंदोलन करण्याचा इशारा दिला असता फक्त गटविकास अधिकारी हदगाव यांनी ऊतर दिले, मुध्दत देऊन सुध्दा न्याय हक्क मिळालाच नाहि साधे प्रश्नाचे उतर मिळाले नसल्यामुळे दिव्यांग कक्ष जिल्हा परिषद नांदेड यांच्या कडे दि,११ मार्च २२निवेदन, रितसर दिव्यांगाच्या प्रश्नाकडे लक्ष घालून नांदेड जिल्ह्यातील गटविकास अधिकारी यांच्याकडून न्याय मिळवुन देण्यासाठी तक्रार लेखि दोन निवेदन देऊन हि दिव्यांग कक्ष यांना सुध्दा साधे उतर प्रशासन यांच्या कडुन मिळाले नाही,


अशा कडक उन्हात दि २९ मार्च २२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे चारशे दिव्यांग बांधवानी धरने आंदोलन व समविचारी संघटनेने ३० मार्चला एल्गार मोर्चा काढुनी सुध्दा न्याय हक्क मिळाला नाहि म्हणुन *दि ६,७ एप्रील २२ रोजी जिल्हा परिषद कार्यालय नांदेड येथे अमरण उपोषण मा अतिरिक्त मुख्यकार्यकारी साहेब, समाजकल्याण अधिकारी यांनी शिष्टमंडळा सोबत चर्चा करून संबंधित विभागास लेखी देऊनही
न्याय मिळाला नाही, तेंव्हा उपमुख्यकार्यकारी पंचायत विभाग नांदेड या़ची प्रत्यक्ष भेटुन दिव्यांगानी आंदोलन करूनहि आपले कनिष्ठ अधिकारी साधे ऊतर दिले नाहि तेंव्हा त्यांनी 11


मे,22 सर्व गटविकास अधिकारी यांना लेखि आदेशाला कनिष्ठ अधिकारी यांनी केराची टोपली दाखवली साधे उतर मिळाले नाही
कुंभकर्ण झोपेत असलेल्या लोकप्रतिनिधी, प्रशासन जागे होत नसल्याने *दिव्यांग जनता दल सामाजिक स़गटना व दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र यांच्या संयुक्तपणे स़स्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कु़चेलिकर, कुलकर्णी काका,ज्ञानेश्वर नवले*, यांच्या नेतृत्वाखाली अशा कडक उन्हात *दिव्यांग आयुक्त कार्यालय पुणे येथे दिव्यांगाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी दि 17 मे 2022* रोजी सकाळी 11 ते 5 पर्यत अर्ध नग्न बोम मारो धरने आंदोलन करून तालुका जिल्हा विभागावर आंदोलन केले पण तालुक्यातील अधिकारी साधे निवेदनाचे ऊतर का?मिळत नाही म्हणून दि २५ मे २०२२ रोजी दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांच्या नेतृत्वाखाली दि २५ मे २०२२ रोजी गटविकास अधिकारी, कंधार, तहसिलदार साहेब कंंधार येथे चर्चा करून चौकशी केली असता दोन्हि कार्यालयात रजिस्टर मध्ये अर्जाची नोंद नसल्याची धक्कादायक माहिती मिळाली तेंव्हा वरीष्ठ अधिकारी या गंभीर बाबींची नोंद घेऊन दिव्यांग हक्क २०१६ दप्तर दिरंगाई कायद्यानुसार स़बधितावर योग्य ते कार्यवाहि मा कर्तव्य दक्ष मुख्यकार्यकारी अधिकारी साहेब करून दिव्यांगाना न्याय देतील काय असे लेखी निवेदन गटविकास अधिकारी, तहसिलदार साहेब कंंधार यांना देण्यात आले या निवेदनावर चंपतराव डाकोरे पाटिल, बालाजी राठोड,चांदु गवाले, महेंद्र सोनकांबळे इत्यादी चर्या सह्या आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *