खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले मन्याड नदीत  बुडून मृत्यू पावलेल्या कंधार येथिल दोन मुलांच्या कुटूंबियाचे सांत्वन

कंधार ; दिगांबर वाघमारे

कंधार येथिल मन्याड नदी पात्रात नुकतेच दि २५ मे रोजी दोन मुलांचा पोहण्यास जावून मृत्यू झाला होता . त्या दोन्ही कुटूंबियाची भेट घेवून आज गुरुवार दि.२६ मे रोजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी  सांत्वन केले .

नांदेड चे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर  हे आज खासदार चषक क्रिकेट चषकाच्या बक्षिस वितरण सोहळपासणी  कंधार येथे  आले होते , त्यांनी सर्वप्रथम दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या दोन मुल्याच्या कुटूंबियाची भेट घेतली .

सौरभ सतीश लोखंडे व ओम राजु काजळे हे दोघे दि.22-05-2022 रोजी मन्याड नदी मध्ये पोहण्यासाठी गेले असता पाण्यात बुडून मृत्यू झाला होता.आज त्यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट देऊन कुटुंबाला आधार दिला.

यावेळी सोबत भाजपा युवामोर्चा जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख,युवामोर्चा महानगराध्यक्ष जिवन पाटील घोगरे,भाजपा कंधार तालुकाध्यक्ष भगवान राठोड,शिक्षक आघाडी तालुकाध्यक्ष राजहंस शहापुरे,भाजपा कंधार तालुका सरचिटणीस किशन डफडे , भाजपा शहरउपाध्यक्ष चेतन भाऊ केंद्रे,शहरसरचिटणीस मधूकर पाटील डांगे,राजु पाटील मुकनर, व्यंकट मामडे,व्यंकट नागलवाड,अविनाश गीत्ते,डुमणे सर,संभाजी घुगे, बालाजी तोटावाड,रजत शहापुरे आदी कार्यकर्ते व तहसीलदार व्यंकटेश मुंडे, तालुका कृषी अधिकारी , मंडळ अधिकारी, तलाठी,तथा कंधार पोलिस स्टेशन चे एपीआय व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *