मुक्ताईसुताचा बछडाच,प्रति मुक्ताईसुत प्रा.डाॅ.भाई पुरुषोत्तम भाऊ धोंडगे

कंधार 

मन्याड खोरे उच्चारताच चळवळीचे माहेरघर वाटते .कारण जुलमी निजामी राजवटी विरुद्धच्या चळवळी पासून आज पर्यंतच्या राजकिय चळवळी पर्यंत सात-आठ दशके अविरत न थकता एक तत्वी एक पक्षी समाजोध्दारक विचार-आचार स्वकर्तृत्वाने विद्रोह निर्माण करुन मन्याड खोर्‍यातील ढाण्या वाघ ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी माजी खासदार व आमदार मुक्ताईसुत डाॅ.भाई केशवराव धोंडगे यांनी विद्रोही विचारवंत म्हणून महाराष्ट्र नव्हे संपुर्ण देशावर आपल्या कार्यकतृत्वाची चुणुक दाखवून वयाची शंभरी पार करून अधुनिक युगातील तरुणांना आदर्शांचा दीपस्तंभ म्हणून आजही त्यांचे नाव आदराने घेतले जाते.

डाॅ.भाई केशवराव धोंडगे साहेब व सौ.चंद्रप्रभावतीबाई केशवराव धोंडगे यांच्या उदरी मातोश्री मुक्ताई कृपाशीर्वादाने धोंडगे घराण्यात भारताचे पहिले पंतप्रधान दिवंगत पं.जवाहरलाल नेहरू यांच्या सोळाव्या स्मृतीदिनी पुरुषोत्तममासात(अधिकमास ) क्रांतिभुवन बहाद्दरपुरा नगरीत २७ मे १९८० रोजी जन्म झाला.लहानपणापासून चुणुकदार दिसणारा बालक दुडूदुडू शाळेत जाऊ लागला.त्यांचे प्राथमिक शिक्षण श्री शिवाजी बालक विद्या मंदिर कंधार या शाळेत झाले.हायस्कूलचे शिक्षण श्री शिवाजी विद्या मंदिर (माध्यमिक) विद्यालय हतईपुरा कंधार येथील ज्ञानालयात घेत असतांना बालपणी सर्व लाड माजी आमदार भाई गुरुनाथराव कुरुडे काका यांनी  त्यांच्या सर्व भावंडाची लाड पुरवले.

वडील खासदार व आमदार असतांना नेहमीच कामासाठी दिल्ली, मुंबई, नागपूर या महानगरा सहित मतदार संघात लोकहिताचे काम करत असतांना त्यांना वेळच मिळत नसे.त्यावेळी त्यांना कोणतीही कमतरता पडू दिली नाही.आजही डाॅ.भाई केशवराव धोंडगे व भाई गुरुनाथराव कुरुडे म्हणजे लाला खंदारी कृष्ण-सुदामा म्हणून ख्यातकीर्त आहे.त्यांंना पुरुषोत्तम भाऊ आदर्शठायी मानतात. 

पुरुषोत्तम भाऊ धोंडगे यांचे महाविद्यालयीन शिक्षण श्री शिवाजी काॅलेज शिवाजीनगर कंधार येथे पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करुन औरंगाबाद येथील क्रीडा महाविद्यालयात शारिरीक शिक्षणात पीएचडी पुर्ण करुन डाॅक्टर उपाधी मिळविली.लोहा मोड वरील छ.शिवाजी महाराज यांचा पुतळा गनीमी काव्याने २००७ वर्षीच्या १ मे रोजीच्या महाराष्ट्र दिन अन् कामगार दिनी बसविला त्या सत्याग्रहास तत्कालीन शिवसेनेचे माजी आमदार रोहिदासराव चव्हाण यांनी पाठिंबा देवून सहकार्य केले.त्यामुळेच धोंडगे-चव्हाण या दोन पाटील परिवारात ऋणानुबंधाची दृढ होत, रोहिदासराव चव्हाण यांची कन्यारत्न कु.मनिषा (सोना) यांच्याशी पुरुषोत्तम भाऊ धोंडगे यांचा विवाह गोरज मुहूर्तावर लोहा नगरीत ३० एप्रिल २००८ रोजी वैवाहिक जीवनारंभ आरंभ केले.

श्री शिवाजी विधी महाविद्यालय कंधार येथे क्रिडा विभागाचे हेड ऑफ डिपार्टमेंट बनुन विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना क्रिडा प्रशिक्षक म्हणून उत्तम कार्य करीत आहेत. 

त्याआधी श्री शिवाजी काॅलेज शिवाजीनगर कंधार या महाविद्यालयाच्या स्थानिक नियोजन समितीचे अध्यक्ष म्हणून प्रा.डाॅ.भाई पुरुषोत्तम केशवराव धोंडगे यांनी यशस्वी कारकीर्द अखंडीत सुरु ठेवली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत बहाद्दरपुरा सर्कल ओपन पुरुष मला वाटते २००७ या वर्षी जाहिर होताच! श्री शिवाजी काॅलेज शिवाजीनगर कंधार येथे बहाद्दरपुरा सर्कलच्या कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया जाणुन घेण्याची बैठक आयोजित केली.त्या अनेक मान्यवर कार्यकर्त्यांनी आपले विचार मांडतांना विजय निश्चितच आहे.असे मांडले.मलाही विचार मांडण्याची संधी मिळताच हा विजय आपल्या दृष्टीक्षेपात आहेच पण पुरुषोत्तम भाऊ तुमची वाट महाराष्ट्र विधानसभेत असलेली क्रांतिकारी विचारांची खुर्ची पाहत आहे.कारण दिवंगत माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक साहेब पदावर असतांना मुखेड दौऱ्यावर आले असता,रात्रीची वेळ होती.त्यावेळी धोंडगे साहेब आपण ज्या खुर्चीकडे आम्ही पाहून भाषण करण्याची प्रेरणास्त्रोत मानायचो पण..त्या खुर्चीवर बसून सुध्दा त्या धड बोलता येत नाही.साहेब तुमच्या विना महाराष्ट्र विधानसभा अधुरी वाटते!असे गौरवोद्गार काढून मुक्ताईसुताची स्तूती समने उधळतांना मलाा साक्षीदार होता आले.

नांदेड जिल्हा परिषद बहाद्दरपुरा सर्कलचे २०१२ ते २०१७ या पाच वर्षांत प्रतिनिधित्व करतांना अनेक क्षेत्रात विकासाची कामे करुन आपल्या कारकीर्दीस योग्य न्याय दिला.एवढेच काय त्यांच्या बाबांनी म्हणजे डाॅ.भाई केशवराव धोंडगे यांनी महाराष्ट्र विधानसभेत ९ ऑगस्ट १९९३ साली एक स्थगन प्रस्ताव मांडून महाराष्ट्र विधानसभेत अधिवेशन काळात कामकाज सुरु होण्या आधी राष्ट्रीय गीत वंदेमातरम गावून सुरुवात होते.

तसेच नांदेड जिल्हा परिषदेच्या कामकाजाची सुरुवात वंदेमातरम या राष्ट्रीय गीताने आरंभ करुन आपल्या वडीलाच्या पाऊलावर पाऊल ठेवून खरच इतिहास घडविला.कंधार नगर परिषदेत वंदेमातरम या राष्ट्रीय गीताला विरोध झाल्यावर त्यांच्या विरोधात भाई पुरुषोत्तम भाऊ धोंडगे यांनी रान उठवत वंदे मातरम व्देशी स्वार्थांध प्रवृतीला मोर्चाच्या माध्यमातून ठेचली.आजही ही दोन्ही देशभक्तीमय वंदेमातरम राष्ट्रीय गीत म्हणण्याचा पायंडा आजही सूरू आहे.

कंधार शहरात सी.बी.ए.ई इंग्लिश मीडियमचे शिक्षण घेण्यासाठी मन्याड खोर्‍यात मातोश्री प्रतिष्ठानचे स्थापना करुन  भव्य इमारत बगीच्यासह उभारुन विद्यार्थ्यांची ज्ञानलालसा पुर्ण करण्यासाठी छ.शंभू राजे इंग्लिश मीडियम स्कूल वीर नागोजी नाईक चौक कंधार या नावे ज्ञानालयात अधिश्वरी सौ.मनिषाताईंना सोबत घेवून सुरु केले.आज प्ले ग्रुप पासून बारावी पर्यंत शिक्षण घेण्याची व्यवस्था झाल्याने पालकवर्ग आनंदीत आहे.

कोरोना महासंकटा आगोदर लोहा तालुक्यातील सोनखेड येथील अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग केलेल्या नराधमास कठोरातली कठोर शिक्षा व्हावी ही मागणी लावून धरली. ज्या कोवळ्या वयातल्या मुलीवर अत्याचार झाला, त्या चिमुकलीच्या वडीलांना आपल्या श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधार या संस्थेतील श्री शिवाजी विद्यालय सोनखेड या शाखेत नोकरीवर घेवून पिडीत कुटूंबाला आधार देत माणुसकीचे दर्शन घडविले! 

.कोरोना महासंकट २१ मार्च रोजी आरंभ झाले.२२ मार्च २०१९ रोजी जनता कर्फ्यू भारत सरकारनी लावले त्यानंतर तीन दिवसांनी देशभर लाॅकडाउनचा आदेश काटेकोरपणे पालन करण्याची सक्ती केली.त्यानंतर महाराष्ट्रात पहिल्यांदा कंधार-लोहा तालुक्यातील डाॅक्टर, नर्स,लॅब चालक,रुग्णवाहिकेचे चालक,मेडिकल चालक यांना श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधारच्या वतीने संस्थेचे सचिव, माजी आमदार यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेचे अध्यक्ष डाॅ.प्रा.भाई पुरुषोत्तम केशवराव धोंडगे यांच्या संकल्पनेतून साकारला.त्याची खरी सुरुवात जंगमवाडी पाटी जवळ तापीने एक महिला विव्हळत पडली होती.त्यावेळी माणुस काय डाॅक्टरर्स त्या महिलेस जवळ जावून विचारपुस करायला धजत नव्हता.त्यावेळी प्रा डाॅ.भाई पुरुषोत्तम भाऊ धोंडगे यांनी कंधार ग्रामीण रुग्णालयात फोन केला पण सुरक्षाकिट डाॅक्टरांना उपलब्ध नसल्यामुळे कोणताही डाॅक्टर पुढे सरसावून येईना,नंतर पुरुषोत्तम भाऊ यांनी सरळ अशोकराव चव्हाण यांना फोन करून त्या महिलेस नांदेड येथील शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाचे पथक येवून त्या महिलेस उपचारासाठी घेवून गेले.ही गोष्ट वारंवार पुरुषोत्तम भाऊ यांना खटकू लागली.म्हणून त्यांनी सुरक्षाकिट आपले बाबा ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, मुक्ताईसुत डाॅ.भाई केशवराव धोंडगे यांच्या शतकोत्सवी वर्षानिमित्त कंधार येथे श्री शिवाजी विधी महाविद्यालयाच्या प्रांगणात तर लोहा येथे संत गाडगे महाराज महाविद्यालयाच्या प्रांगणात कार्यक्रम घेऊन वाटप केले.

हल्लीच्या चाकावर चालणाऱ्या अधुनिक युगात आम्हास  वेळच मिळत नाही .ही ओरड सर्वत्र ऐकण्यास मिळते.पण अपवाद या मन्याड खोर्‍यात सामाजिक बांधिलकी जपणारे एक मानवता परमो धर्म मानणारे, व्यक्तीमत्व म्हणजे डाॅ.प्रा.पुरुषोत्तम भाऊ धोंडगे! 

हा कार्यक्रम पार पाडल्या नंतर ना.अशोकराव चव्हाण यांच्या साक्षीने कंधार मामलेदार यांचे कार्यालयात मामलेदार साहेब यांना संस्था सचिव भाई गुरुनाथराव कुरुडे यांच्या समर्थ हस्ते प्रदान करतांना प्रा.डाॅ.भाई पुरुषोत्तम भाऊ धोंडगे रुपये १ लक्षचा धनादेश सुपुर्द करुन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत खारीचा वाटा उचलत मानवता धर्म जपला. कोल्हापूर ,सांगली महापुराच्या महासंकटात मुख्यमंत्री सहाय्यता निधीत अध्यक्ष डाॅ.प्रा.भाई पुरुषोत्तम भाऊ धोंडगे यांच्या संकल्पनेतून शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधार यासंस्थेच्या वतीने एक लक्ष रुपयाची मदत केली.काल परवाच महाराष्ट्रात आलेल्या पुराने चोहीकडे हाहाकःर माजवला.त्यावेळेसही श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधार च्या वतीने सचिव माजी आमदार भाई गुरुनाथरावजी कुरुडे साहेब व अध्यक्ष डाॅ.प्रा.भाई पुरुषोत्तम भाऊ धोंडगे यांनी धर्मदाय आयुक्तांना एक लक्ष रुपयाचा धनादेश देण्यात आला.

राज्यातील नव्हे देशातील  शिक्षण महर्षी, नुकतीच वयाची शंभरी पार करणारे क्रांतिवीर डाॅ.भाई केशवराव धोंडगे यांच्या शतकोत्सवी वर्षानिमित्त मानवता धर्म सामाजिक बांधिलकीतून जपतांना “भाऊचा डबा” उपक्रमास १ मे २०२१ या महाराष्ट्र दिन व कामगार दिनी संपुर्ण देशात लाॅकडाउनची कडक कारवाई सुरु होती.त्या वेळी संपुर्ण कडकडीत बंद असल्यामुळेच कोरोनाग्रस्त व त्यांच्या नातेवाईकाची अन्न मिळविसाठी तारेवरची कसरत होती.ही नड बरोबर प्रा.डाॅ.भाई पुरुषोत्तम भाऊ धोंडगे यांनी ओळखत “भाऊचा डबा” ही संकल्पना राबविण्यास सुरुवात केली.आज हा भाऊचा डबा उपक्रम पाहता-पाहता ४०० दिवसाचा कार्यकाळ अखंडीत पार करुन रेकॉर्ड केला.या पुढेही भाऊचा डबा सुरुच राहणार असे अनेक प्रसिध्दी माध्यमापुढे बोलून दाखविला.

ज्यांचे पालकत्व कोरोनाने हिरावले अशा पाल्यांनां दत्तक घेण्याचा मनोदय संस्थेच्या माध्यमातून करण्याचा निश्चय केले.एव्हढेच नव्हे तर डाॅ.प्रा.पुरुषोत्तम भाऊ धोंडगे यांनी सुरुवातीपासून म्हणजे पुरुषोत्तम भाऊ  युवा मंचाच्या स्थापनेपासून सोबत राहणारा त्यांचा इमानदार ,एकनिष्ठ ,हृदयापासून पूर्णपणे समर्थन करणारा मौ. चिखलभोसी ता कंधार येथील युवामंचाचा अध्यक्ष उत्तम कार्यकर्ता उमाकांत वरपडे यांना अर्धांगवायू होवून दिव्यांग झाला.त्यामुळे त्यांच्या कुटुंबाच्या वाट्याला बिकट परिस्थिती आली.डाॅ.प्रा. पुरुषोत्तम भाऊनां भेटण्यास आले तेंव्हा त्यांनी व त्यांच्या पत्नीने लेडीज एम्पोरियम हा छोटा उद्योग सुरु करण्याची इच्छा व्यक्त केली.

त्या कुटुंबाला मदत करुन उभे करावे या उद्देशाने  त्यांना ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी माजी खासदार व आमदार आदरणीय डॉ भाई केशवरावजी धोंडगे साहेबांच्या शतकोत्सवी वर्षाचे औचित्य साधून, भाऊसाहेबांची आई सौ. चंद्रप्रभावतीबाई केशवरावजी धोंडगे यांच्या समर्थ हस्ते वरपडे दाम्पत्याचा सत्कार करून त्यांना शतकोत्सवी वाढदिवसाच्या औचित्यानेच डाॅ.प्रा.पुरुषोत्तम भाऊ यांचे पिताश्री,ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी,विद्रोही विचारवंत, माजी खासदार व आमदार डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे व भाऊच्या  मातोश्री ग्रामिण लेखिका, मुक्ताई मुद्रणालय क्रांतिभुवन बहाद्दरपुराच्या संचालिका सौ.चंद्रप्रभावतीबाई केशवरावजी धोंडगे माय यांच्या समर्थ हस्ते १ लक्ष (१००,०००) रुपयाची  कर्तव्य समजून मदत केली.

तसेच मारतळा येथे एका खाजगी कार्यक्रमात प्रा.डाॅ.भाई पुरुषोत्तम भाऊ धोंडगे गेले असता तेथे एक गरीब कुटूंबात जन्मास आलेली हुशार मुलगी ही गरीब परिस्थिती असल्यामुळेच शाळा सोडण्याची वेळ आली.ही गोष्ट पुरुषोत्तम भाऊ धोंडगे यांच्या लक्षात गावकरी बांधवांनी आणुन देताच त्या विद्यार्थिचे शिक्षण पुर्ण करण्याची जबाबदारी घेवून त्या चिमुकलीस आधार देवून सामाजिक बांधिलकी जपली.

एव्हढेच काय माझे सदर खंदारी वात्रटिका,कंधारी आग्याबोंड, शब्दबिंब यांचे कौतुक करुन एकत्र पुस्तक या शतकोत्सवी वर्षानिमित्त प्रकाशित करण्याचा संकल्प सोडून माझ्या लेखनीस शाबासकीची प्रेरणा देवून मला प्रोत्साहित केले.ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी,माजी खासदार व आमदार, सुग्या-मुग्याचा आधार,जीभजोड साहित्याचा दर्दी,स्वतःच्या कतृत्वावर मन्याड खोर्‍यात ज्ञानाचे लंगर खुले करणारे, मुक्ताईसुत डाॅ.भाई केशवराव धोंडगे यांच्या शतकोत्तर महोत्सव “न भुतो न भविष्य ती”करण्याचा दृढनिश्चय करुन प्रत्यक्ष कामास सुरुवात केलीही.

तसेच श्री शिवाजी विधी महाविद्यालयाची विद्यार्थिनी दिव्यांग क्रिडापटू कु.भाग्यश्री जाधव हीस श्री शिवाजी लाॅ काॅलेज कंधारच्या वतीने डाॅ.भाई केशवराव धोंडगे यांच्या समर्थ हस्ते अन् सचिव, माजी आमदार भाई गुरूनाथराव कुरुडे यांच्या अध्यक्षतेखालील भव्यदिव्य सत्कार करुन कु.भाग्यश्रीचा ह्रदय सत्कार केला.काल परवा त्या गुणवंत सुवर्ण कन्येस श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधारच्या वतीने १ लक्ष रुपयाचे बक्षीस देवून सन्मानित केले.

आजच्या ४१ व्या वाढदिवसानिमित्त प्रा.डाॅ.भाई पुरुषोत्तम भाऊ केशवराव धोंडगे यांना दीर्घायुरारोग्य विक्रमादित्य हर्षित परिमय अभिष्टचिंतन!

गोपाळसुत 

dattatrya yemekar
dattatrya yemekar

दत्तात्रय एमेकर गुरुजी,रा.क्रांतिभुवन बहाद्दरपुरा,ता.कंधार 

९८६०८०९९३१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *