स्वच्छता ही आता मानवी प्रवृत्तीच व्हायला हवी- गंगाधर ढवळे


नांदेड –

कोरोना नावाच्या संसर्गजन्य आजार पसरवणाऱ्या मृत्यूच्या विळख्याने अख्खे जगच हादरुन गेले आहे. देशात आणि राज्यात कोरोनाचा कहर सुरुच आहे. हा आजार रोखण्यासाठी पाळण्यात येणारे नियम आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना यांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. कोरोनासह सर्वच रोगांवर स्वच्छता हा परिणामकारक उपाय आहे. स्वच्छता आता मानवी प्रवृत्तीच बनायला हवी, असे प्रतिपादन येथील साहित्यिक गंगाधर ढवळे यांनी केले. ते जवळा देशमुख येथे स्वच्छता हीच सेवा या कार्यानुभव उपक्रमाच्या वेळी बोलत होते.

                          कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, अंगणवाडी कार्यकर्ती तथा सेविकांच्या मदतीने जनजागृती कार्यानुभव उपक्रमाची शृंखला राबविण्यात येत आहे. त्यावेळी ढवळे बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, गावातील कार्यक्षम व जबाबदार तरुणांनी शालेय शिक्षण आणि कोरोनाच्या संदर्भात जनजागरण करावे. स्वच्छता ही कालमर्यादीत संकल्पना नाही. ती सतत चालणारी प्रक्रिया आहे. स्वच्छता, संतुलित आहार, प्रतिबंधात्मक उपाययोजना यांच्या बळावर कोणत्याही संसर्गजन्य साखळीला तोडू शकतो. त्यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यायला हवा असेही ते म्हणाले. 

                             गेल्या आठवड्यात गावात गंदगी हटाव अभियान राबविण्यात आले होते. आता ठिकठिकाणी वाढलेल्या विषारी गाजरगवतावर तृणनाशक फवारण्यात आले.तसेच इतर ठिकाणीही ग्रामपंचायत कार्यालयाकडून सहकार्य घेण्याचे ठरले. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशनराव गच्चे, सदस्य भीमराव गोडबोले, अंकुश पाटील शिखरे, माधव मठपती यांची उपस्थिती होती. या उपक्रमासाठी मुख्याध्यापक ढवळे जी. एस., अंबुलगेकर एस. व्ही., घटकार एस.एम., हैदर शेख, चांदू गोडबोले, धनराज गोडबोले, कमलबाई गच्चे, सुलोचना गच्चे, इंदिरा पांचाळ, नितीन झिंझाडे, साहेबराव ससाणे यांनी परिश्रम घेतले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *