कंधार ; दिगांबर वाघमारे
अखील भारतीय काँग्रेस कमीटीच्या वतीने सबंध देशभर काँग्रेस पक्षाच्या वतीने डीजीटल सदस्य
नोंदणी अभियान देशाच्या नेत्या सोनियाजी गांधी, राहुलजी गांधी, महाराष्ट्र राज्य प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले, राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा नांदेड जिल्हयाचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या आवाहना नुसार व जिल्ल्यात आमदार अमरनाथ राजूरकर, जिल्हा अध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर , सदस्य नोंदणी चे प्रमुख नारायणराव श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले .
डिजिटल सदस्य नोंदणी अभियानात वर्षाताई भोसीकर यांनी लोहा विधानसभा मतदार संघात वाडी तांडे गावोगावी उन्हातान्हाची पर्वा न करता प्रत्यक्ष भेटी देत काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरणे सांगत पालकमंत्री नामदार अशोकराव चव्हाण, यांचे कार्य व नांदेड जिल्ह्याला अशोकराव चव्हाण यांच्या विकासाभिमुख नेतृत्वाची कसी आवश्यकता आहे यासाठी नांदेड जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचे संघटन मजबूत होणे आवश्यक आहे ही भूमिका सांगत व ईश्वरराव भोसीकर यांच्या आमदारकीच्या कार्यकाळात केलेले कार्य व स्वतः जिल्हा परिषद सदस्या असताना केलेले कार्याची माहिती त्यांनी सर्वसामान्य महिलांना व मतदाराना देत केवळ लोहा विधानसभा मतदार संघात नोंदनी करत नांदेड जिल्हयात मध्ये सर्वांत जास्त सभासद नोंदणी केली आहे .
या त्यांच्या कार्याची दखल घेवून सदरील सत्कार सोहळ्यात दि 29 मे रोजी वर्षाताई भोसीकर यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर,माजी मंत्री डि.पी.सांवत, विधानपरिषदेचे गटनेते आमदार अमर राजुरकर, आमदार मोहनअण्णा हंबर्डे,माजी आमदार वसंतराव चव्हाण, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, माजी आमदार हनमंतराव पाटिल बेटमोगरेकर, जिल्हा कांग्रेस अध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, जिल्हा कॉग्रेस सरचिटणीस संजय भोसीकर आदीसह मान्यवरा ची उपस्थिती होती .