कंधार ; प्रतिनिधी
आज दि.30 मे 2022 रोजी कंधार येथील शासकीय विश्रामगृह येथे आम आदमी पार्टी तालुका कंधार वतीने पदाधिकारी व सदस्य यांची महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली त्यात सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी जाणून घेऊ अडचणी सोडवण्यासाठी चर्चा करण्यात येवून कुरुळा सर्कल प्रमुख पदी धोंडीबा जायभाये यांची निवड करण्यात आली .
या बैठकीमध्ये कंधार शहर व तालुक्यात समस्या विषयी चर्चा करण्यात आली व
कंधार तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी जाणून घेऊ अडचणी सोडविण्यासाठी चर्चा करण्यात आली .
तसेच यावेळी आम आदमी पार्टी कंधार तालुक्याच्या वतीने कुरुळा सर्कल प्रमुख पदी धोंडीबा शिवाजी जायभाये यांची निवड करण्यात आली.
या बैठकीला ज्येष्ठ नेते विठ्ठल डांगे,साईनाथ मळगे ता. अध्यक्ष, नितिन भोसीकर ता.सचिव, श्याम जोंधळे ता. उपाध्यक्ष, तिरुपती इंगळे ता उपाध्यक्ष, बबन केंद्रे ता.उपाध्यक्ष, संभाजी वाघमारे शहराध्यक्ष कंधार, गंगाधर मोरे सदस्य आदीची यावेळी उपस्थिती होती.