देगलूर ; प्रतिनिधी
काही दिवसांवर पेरणीचे दिवस येउन ठेपले असून बळीराजा खत व बियाणे खेरेदी करण्यात व्यस्त आहे.गतवर्षी पेक्षा यावर्षी उन्हाळा भयानक असल्यामुळे शेतीचे कामे करण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत.हवामान खात्याकडून यावर्षी अतिवृष्टी होण्याचा अंदाज वर्तविला असला तरी कांही दिवसावर पावसाळा येऊन ठेपला असल्याने आता शेतीची कामे करण्यासाठी बळीराजा सरसावला आहे.यात उन्हाळी पाळी,चिपाड,तण वेचणी आदीच्या कामात व्यस्त आहेत.पण उन्हामुळे सध्या तरी मजूर मिळत नसल्याने कामाचा तान शेतकरी कुटुंबावर पडत आहे.
खते,बि.बियाणे खरेदी करण्यासाठी कृषी केंद्रावर शेतकऱ्यांची तोबा गर्दी दिसून येत आहे.पण बियाणे व खतांच्या किमंती वाढल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे.कृषी केंद्रावर अनेक कंपनीचे बियाणे व खते आल्याने नेमके कोणते बियाणे घ्यावेत या संभ्रमात शेतकरी पडला आहे.
तर एकीकडे जिल्ह्याच्या ठिकाणी बियाणे तयार करताना एक कंपनी बोगस बियाणे तयार करीत असल्याने कृषी विभागाने झापा मारून तेथील बोगस बियाणे जप्त केली आहेत.
नांदेड जिल्ह्यातील खत तयार करणाऱ्या कंपन्या व शासनाची परवानगी नसणाऱ्या कंपन्या अधिकाऱ्यांना धरून संगनमताने भेसळ खत तयार करून भोळ्याभाबड्या बळीराजा ची लूट करीत आहेत. प्रशासकीय अधिकाऱ्यांना चिरीमिरी देऊन शांत करून बिनधास्तपणे बाजारात बनावट खत तयार करून विक्री केली जात आहे.
अशी तक्रार शिवसंग्राम संघटनेचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील आलूरकर यांनी जिल्हाधिकारी देगलूर निवेदनाद्वारे केली. सदरील निवेदांची तात्काळ दखल घेऊन बळीराजा ची लूट थांबवावी अन्यथा 10 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिवसंग्राम संघटनेच्या वतीने बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल.
यावेळी उमेश पाटील आडलुरकर जिल्हा अध्यक्ष शिवसंग्राम संघटना नांदेड, शिवा पाटील कबनूरकर,खंडू कांबळे,मुसा देसाई ,शिवकुमार झरे आधीच्या आदिच्या सह्याने निवेदन देण्यात आले.