कंधार—- पंचायत समिती कंधार अंतर्गत फुलवळ ग्रामपंचायत येथील ग्रामसेवक अशोक मंगनाळे हे नुकतेच २७ वर्षाच्या स्वच्छ,निर्मळ व कर्तव्यदक्ष सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. त्यांचा शिवा वीरशैव कर्मचारी महासंघ ता.शा.कंधार संघटनेच्यावतीने सेवापुर्ती निमित्ताने सेवानिवृत्तीबदल सपत्नीक सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष जी. एस. मंगनाळे, बाबुराव फसमल्ले, तालुकाध्यक्ष प्रताप देशमुख, उपाध्यक्ष डी.एन.मंगनाळे, तालुका प्रमुख सल्लागार व्ही.एस.आमलापुरे, वाशिम जिल्हा उपाध्यक्ष बसवेश्वर मंगनाळे, श्रीनिवास मंगनाळे आदी उपस्थित होते.