फुलवळ येथे शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा..

फुलवळ ( धोंडीबा बोरगावे )

         अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत , हिंदवी स्वराज्याचे संस्थापक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांचा ता. ६ जून १६७४ रोजी राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला , याच दिवसाचे औचित्य म्हणून गेलेवर्षी पासून ता. ६ जून हा शिवस्वराज्य दिन म्हणून सर्वत्र साजरा करावा असा महाराष्ट्र राज्य सरकारने अध्यादेश काढला , त्याचेच पालन करत आज फुलवळ ग्राम पंचायत कार्यालय येथे शिवस्वराज्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 

  यावेळी कलश पूजन करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच विमलबाई मंगनाळे व ग्रामविकास अधिकारी अमृता मंगनाळे यांनी केले तर  उपस्थितांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर भगव्या ध्वजाला मानवंदना देऊन सामुदायिकपणे  राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत म्हणण्यात आले.

    यावेळी सरपंच विमलबाई मंगनाळे , उपसरपंच तुळशीदास रासवंते , ग्रामविकास अधिकारी अमृता मंगनाळे , ग्राम पंचायत सदस्य चंदबस मंगनाळे , बालाजी देवकांबळे , श्रीकांत मंगनाळे , अनिता देवकांबळे , सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी अशोक मंगनाळे , नागनाथ मंगनाळे , देविदास फुलवळे , विठ्ठल तुप्पेकर , मोकिंद देवकांबळे , रहीम शेख , जि.प.शाळेचे मु. अ. बालाजी केंद्रे , कामाजी मंगनाळे , हिरकांत मंगनाळे , कैलास मंगनाळे , मनोहर जाधव , लक्ष्मण जाधव , राजू राठोड , मंगेश पांचाळ ,  पत्रकार धोंडीबा बोरगावे , विश्वांभर बसवंते , शादुल शेख , यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *