आ
कंधार ; प्रतिनिधी
६ जून १६७४ रोजी रायगडावर छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे राज्याभिषेक झाले. हा दिवस म्हणजे सार्वभौमत्व, स्वराज्य व स्वातंत्र्याची स्थापना दिवस म्हणून ओळखला जातो. या दिवसां निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय नगर परिषद कंधार तर्फे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्यावरील असलेल्या ग्रंथ तसेच स्पर्धात्मक ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन आज दि ६ जुन रोजी करण्यात आले.

यावेळी सर्वप्रथम स्वच्छता निरीक्षक श्री जितेंद्र ठेवरे, यांच्या हस्ते छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. तसेच मोहम्मद रफीक सत्तार स. ग्रंथपाल यांनी स्वराज्यभिषेक दिनाचे महत्त्व सांगितले तसेच या दिवसां निमित्त ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन केले असून या प्रदर्शनाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले.

यावेळी मोठ्या संख्येने वाचक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मिलिंद महाराज, किसन भालेराव, राधाबाई जवादवाड, यांनी परिश्रम घेतले.