रायगडावर शिवराज्याभिषेक सुवर्ण सोहळास्थळाचे दर्शन माझ्या सुवर्ण महोत्सवीवर्षात लाभल्याने धन्य झालो……गोपाळसुत- दत्तात्रय एमेकर

भटकंती

भारतातच नव्हे संपुर्ण विश्वस्तरावर इतिहासाच्या पाऊलखुणा मानवांना प्रेरणा देत असतात.त्यातल्यात्यात छ.शिवप्रभुंचा फक्त सुवर्ण महोत्सवी जगण्याचे अख्य आयुष्य मानवजातीला प्रेरणेचा खजाना आहे.रायगडावर जवळपास ३४८ वर्षापूर्वी एक अनमोल सुवर्ण घटीका विश्वावर गारुड घालणारी ठरली.महाराष्ट्राचे विश्वभुषण राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेकाचा दैदिप्यमान सोहळा गागा भट्टाच्या समर्थ हस्ते अन् सुमधुर मंत्रोच्चारात पार पडला.तो सोहळा ज्या राजेशाही थाटामाटात पार पडला.त्या शिवराज्याभिषेक पिठावर बत्तीस मन सोन्याची मेघडंबरी आणि त्यात विराजमान राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज हे गोडस अन् देखणं दृष्ट लागावी असे लोभस होते.याच महिन्यात म्हणजे १ जुन २०२२ रोजी किल्ले रायगडी जाण्याचा योग आला.३१ मे रोजी संध्याकाळचा आमचा प्रवास पाचाड या मातोश्री जिजाऊ माॅ.साहेब यांच्या समाधीस्थळ नगरीत प्रवेशतांना झाला.रात्रीचा मुक्काम पाचाड येथे करुन सकाळी ७:३० वाजता राजमाता,शिवप्रभुंच्या मातोश्री जिजाऊ आईसाहेब यांच्या समाधीस्थळी दर्शनाने झाली.त्यावेळी तेथील वातावरण ऐतिहासिक घटणेमुळे प्रेरणेचे स्रोत आहे.तेथील बोर्ड वाचताच मन हेलावले माझ्या महाराष्ट्रात या समाधी स्थळाची अवस्था अस्वस्थ करणारी होती.सध्या सुस्थीतीतले मातृतीर्थ पाहून आनंद वाटला.नंतर आम्ही रायगडी जाण्यास निघालो.

आमचे कार चालक आदरणीय संतोष पंढरे धर्मापुरीकर यांनी आधीच रोप-वे बद्दल कुतहलाने सांगीतले की आत्ता पर्यंत आपण जे पाहिलो त्यापेक्षाही आपल्याला आनंदीत करणारा रायगड किल्ला डोळ्याचे पारणे फेडणारा आहे.मला रोप-वे ची मनात भीती होतीच पण आम्ही रोप-वे च्या ठिकाणी पोहंचलो.माझा मुलगा दृष्टांत व चालक संतोष पंढरे यांनी विचारपुस करुन तिकीट काढले.पण दिव्यांगांना रोप-वेचा प्रवास मोफत असतो.चौघांचे १३०० रुपयांची तिकिटे काढून रोप-वे चा प्रवास परमोच्च आनंद देणारा ठरला.रोप-वेनी रायगडावर जाताच तेथील गाईड माहिती सांगण्यासाठी सज्ज असतात.वृध्द,दिव्यांग यांना रायगड संपुर्ण दाखवणायाची जबाबदारी घेतात.त्यावेळी उघड्या पालखीतून दाखविण्याची फिस ३६०० रुपये घेवून रायगडावरील सर्व महत्वाचे ऐतिहासिक ठिकाणे माहिती देत दर्शन घडविले.


त्यात मीना दरवाजा,राणी महल,मावळ्यांची निवासस्थाने,अष्टप्रधान मंडळांची निवास्थाने, भांडारगृह,
होती मैदान,बाजारपेठ,टकमक टोक,हिरकणी बुरुज,जगतीश्वराचे मंदिर,छत्रपतीची चीरसमाधी वाघ्यांची समाधी,महाराजाचे उत्कृष्ट अभियंता हिरोजी इंदुलकर यांनी कोरलेली त्यांच्या इच्छेनुसार महाराजांनी हिरोजी यांना म्हटले की तुम्ही जे मागाल ते मी देईन पण हिरोजी इंदुलकर यांनी म्हणटले महाराज मला फक्त एक पायरीवर “सेवेच्या ठायी तत्पर,हिरोजी इंदुलकर” हे नाव दगडावर कोरलेले नाव जगदीश्वर अन् महारांच्या चीरसमाधी यांच्या असल्यास दरवाजाच्या पायरीला लावू देण्याची अनुमती द्यावी.जेणे करून महाराजांच्या दर्शनास येणार्या शिवभक्तांचच्या चरणाचे धुलीकण माझ्या नावावर पडल्यास मला समाधान वाटेल, याला म्हणतात खरी स्वामी भक्ती.रायगड किल्ला व सर्व रायगडावरील ऐतिहासिक ठिकाणांच्या दर्शनाने धन्य झालो…!

जय भवानी….जय शिवाजी…..जय जिजाऊ…जय रायगड…जय महाराष्ट्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *