कंधार ; प्रतिनिधी
कंधार येथे मंजूर झालेल्या 100 खाटांच्या श्रेणीवर्धित उपजिल्हा रुग्णालयाचे लवकरच सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन बांधकाम सुरू होणार आहे परंतु काही लोकांच्या विकासकामे पचनी पडत नाही म्हणून वेगवेगळ्या अफवा पसरत आहेत की, सदर कंधार उपजिल्हा रुग्णालय हा विषय न्यायप्रविष्ठ आहे पण तो विषय न्यायप्रविष्ट नसून तो लवकरच आपल्या सेवेत सत्यात उतरेल आणि या 100 खाटांच्या भूमिपूजन कार्यक्रमास एकनाथ पवार आपण हजर राहून प्रत्यक्ष कार्यक्रमाचा आनंद घ्यावा आणि विकासात्मक बाबीवर नकारात्मक प्रतिक्रिया देऊन आपण जास्त दिवस राजकारण करू शकत नाही हे आपण लक्षात घ्यावे असे आवाहन आमदार श्यामसुंदर शिंदे समर्थक बालाजी ईसादकर यांनी केले .
बालाजी ईसादकर पुढे म्हणाले की राहिला प्रश्न आमदारकीचा यावेळेसही लोहा कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार शामसुंदर शिंदे आणि पुढच्या वेळेस ही आमदार शिंदे आणि लोहा कंधार मतदारसंघातील विकासकामे करण्यासाठी लोहा कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्यामसुंदर शिंदे समर्थ असल्याचा टोला ही त्यांनी एकनाथ पवार यांना दिला आहे .

