आजचा लेखाचा हा विषय माझ्या नवऱ्याने दिलाय.. सकाळी उठल्या उठल्या मला म्हणाला तुला एक जोक सांगतोएक मुलगा मुलगी पाहायला तिच्या घरी जातो आणि तिथुन लगेच पळुन येतो.. त्याचा मित्र विचारतो का रे पळुन का आलास?? .. त्यावर तो म्हणतो अरे मी तिच्या आईसोबत फेसबुक वर फ्लर्टींग करतो.. सचिन मला म्हणाला असच तुझ्या बाबतीत होइल सोनल.. हेल्दी फ्लर्टींग असेल तर हेल्थ पण चांगली रहाते..
कोणी कोणात आणि कशात किती गुंतावं हा त्याचा प्रश्न .. पण मी त्याचा आनंद घेते.. त्यात छान रमते आणि सगळे मेसेजेस सचिन ला वाचुन दाखवते .. दोघेही मनसोक्त हसतो आणि हेल्दी रहातो… sonal I Love yu सचिन जितक्या वेळा म्हणाला असेल त्याच्या हजार पटीने लोक म्हणतात.. काल एका मित्राला म्हटलं काय रे कुठे गायब?? .. हम आपके दिल मे रहते है .. हे त्याचं उत्तर सचिन ला वाचुन दाखवल्यावर सचिन म्हणाला त्याला सांग लवकर बाहेर ये तिथुन नाहीतर गुदमरुन मरशील तिथे आधीच खुप गर्दी आहे.. असं हे आमचं नातं..
तीशीचा मुलगा फ्लर्टींग करतो ना तेव्हा अजुन छान दिसावं वाटतं.. व्यायाम करावा .. माझ्या चेहऱ्यावर असलेला ग्लो हे त्याचच कारण आहे.. पाकातली पुरी पाकातुन बाहेर काढल्यावर थपथपलेली असते तशी रोमॅन्टिक कादंबरीचं लिखाण सुरु आहे आणि काल दुपारी जेव्हा मी लिहीत होते तेव्हा त्याचं गोड फ्लर्टींग आठवुन लिहीत होते त्यामुळे लिहायला मजा येत होती आणि त्यामुळे तुम्हाला वाचायलाही मजा येइल.. सकारात्मकतेने सगळं घेतलं तर काय होवु शकतं याचं हे उत्तम उदाहरण आहे..
त्यामुळे फ्लर्टींग करत रहा.. फक्त कुटुंब जपा आणि आपल्यामुळे समोरच्याला आणि त्याच्यामुळे आपल्याला त्रास होणार नाही याची काळजी घ्या.. प्रेमात पडताना प्राजक्ताच्या फुलासारखं पडा आणि सुगंध देत रहा..
सोनल गोडबोले
लेखिका, अभिनेत्री