महीलेची फसवणूक केल्या प्रकरणी उस्माननगर पोलीसात गुन्हा दाखल ; नांदेड जिल्हा क्रॉईम

पोलीस अधिक्षक कार्यालय, नांदेड जा.क्र. 234 / 2022 दिनांक : 08.06.2022 यांच्या मार्फत

1)मो. सा. चोरी :

1) किनवट :- दिनांक 04.06.2022 रोजी 22.30 ते दिनांक 05.06.2022 रोजी 06.00 वा. चे दरम्यान, फिर्यादीचे घरासमोरुन कल्याणनगर गोकुंदा ता. किनवट जि. नांदेड येथे, यातील फिर्यादीची हिरो स्पेलंडर प्रो कंपनीची काळया रंगाची मोसा क्र. एमएच-26/ए.क्यु.- 9776 किमती 16,000/- रुपयाची नमुद ठिकाणावरून कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. वगैरे फिर्यादी डॉ. अश्वघोष मारोतीराव गायकवाड, वय 40 वर्ष, व्यवसाय वैद्यकीय अधिकारी फुलसांगवी ता. महागाव हनु कल्यान नगर गोकुंदा ता. किनवट जि. नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादवरून पोस्टे किनवट गुरनं 109/2022 कलम 379 भादवी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपास सपोउपनि / श्री मामीडवार, मो.क्र. 9850061133 हे करीत आहेत.

2 ) हदगाव :- दिनांक 04.062022 रोजी 14.30 से 15.30 वा. चे दरम्यान, फिर्यादीचे घरासमोरुन हदगाव ता. हदगाव जि. नांदेड येथे. यातील फिर्यादीची स्पेलंडर प्लस कंपनीची नो सा क्र. एमएच-25 / एक्स-6305 किमती 30,000/-रुपयाची नमुद टिकाणावरुन कोणीतरी अज्ञात चोरटयाने शोरून नेली. वगैरे फिर्यादी हनुमंतराव बापुराव ढगे, दय 6 वर्ष, व्यवसाय शेती रा. आयोध्यानगर ता. हदगाव जि. नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे हदगाव गुरनं 155/2022 कलम 379 भादवी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपास पोह/ 2342 हंबर्डे, मो.क्र. 9234422052 हे करीत आहेत.

2 ) चोरी :

1 ) अर्धापुर : दिनांक 04.062022 रोजी 00.15 वा. से दिनांक 05.06.2022 रोजी 06.00 वा. चे दरम्यान, 33 के.व्ही. उपकेंद्राच्या पाठीमागे ना. कोटांचे पाटर्मिती शेजारी, अर्धापुर ता. अर्धापुर जि. नांदेड येथे यातील अज्ञात आरोपीने अर्घापुर नगरपंचायत अंतर्गत सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेची नव्याने कार्यान्दित केलेली 11 के. व्ही. एक्सप्रेस वाहिनी च्या मीटरिंग अर्थिग सामन्यात आलेली कॉपर स्ट्रीप तांब्याची पट्टी एकुन किन्ती 28.000/-रुपयाचे साहित्य कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेले. वगैरे फिर्यादी नागेश वैजनाथराव शिल्लारे, सहा अभियंता माहावितरण अर्धापुर ता अर्धापुर जि. नांदेड यांनी दिलेल्या दिन पोस्टे अर्धापुर गुरनं 157 / 2022 कलम 379 भादवी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असून तपास पोह/ 1839 कांबळे, मो.9823342386 हे करीत आहेत.

2) अर्धापुर :- दिनांक 06.06.2022 रोजी 22.00 वा. से दिनांक 07.062022 रोजी 06.00 वा. चे दरम्यान, बायपास अर्धापुर शिवार तर अर्धापुर जि. नांदेड येथे यातील अज्ञात आरोपीने रोडगी रोडचे कॅनल जवळील अर्धापुर अंडर ग्राउंड मध्ये कलेले 11 के.व्ही. पॉली कॅब कंपनीचे प्रमोड केबल व आउटडोर किट असा एकुण किंमती ३,३३,०००/-रुपयाचा नाल कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेला. वगैरे फिर्यादी कैलास नारायण तिथे दय 42 वर्षे व्यवसाय प्रोप्रायटर जय इंटरप्राईजेस परभणी यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे अर्धापुर गुरनं 158 / 2022 कलम 379 भादवी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असून तपास सपोउपनि / श्री दळवे, मो. क्र. 7745047777 हे करीत आहेत.

3)मोबाईल चोरी :

1)शिवाजीनगर :- दिनांक 07.06.2022 रोजी 19.00 वा. चे दरम्यान, आधार हॉस्पीटल ते आवस्तीनगर, नांदेड येथे, यातील फिर्यादी हा आधार हॉस्पिटल ते श्रावस्तीनगर कडे पायी जात असताना फिर्यादीच्या शर्टच्या वरच्या खिशात ठेवलेला गर्दीचा फायदा घेवून ओप्पो कंपनीचा ए-53 मोबाईल जुना वापरता किंमती 12.500 /- रुपयाचा कोणीतरी अज्ञात चोरट्याने घोरून नेला. वगैरे फिर्यादी जयवर्धन माधवराव शिंदे, वय 35 वर्षे, व्यवसाय मजुरी रा. भिमसंदेश कॉलनी, श्रावस्तीनगर, नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादवरून पोस्टे शिवाजीनगर गुरनं 222 / 2022 कलम 379 भादवी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपास पोह/ 882 सुर्यवंशी, मो.क्र. 9421670103 हे करीत आहेत.

2) शिवाजीनगर :- दिनांक 03.06.2022 रोजी 05.45 वा. चे सुमारास, अंकुर हॉस्पिटल, नांदेड येथे, यातील फिर्यादी हे पत्नीस डिलीव्हरी साठी अंकुर हॉस्पिटल, नांदेड येथे उपचारासाठी दाखल केले असता ननधील बेडवर ट्रेवलेला वन एरस कंपणीचा नॉर्ड-2 मोबाईल जुना वापरता किंनती 29,999/- रुपयाचा कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेला. वर्गर फिर्यादी सुनिल गंगाराम हसनाळकर, वय 30 वर्ष, व्यवसाय वैदयकीय अधिकारी रा. हसनाळ ता. मुदखेड जि. नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादवरून पोस्टे शिवाजीनगर गुरतं 221/2022 कलम 379 भादवी कायदा प्रमाने गुन्हा दाखल असून तपास पोना / 2547 वाघमारे, मो.क्र. 8669005593 हे करीत आहेत.

4 ) जनावर चोरी :

मरखेल :- दिनांक 04.06.2022 रोजी 21.00 वा. ते दिनांक 05.06.2022 रोजी 05.00 वा. चे दरम्यान, फिर्यादीचे घराचे पाठमागील बाजुस आंगनातील गोठयात मौजे बेम्बरा ता. देगलुर जि. नांदेड येथे यातील फिर्यादीची एक हारण्या रंगाची शेळी किंमती 18,000/- रुपयाची कोणीतरी अज्ञात आरोपीने चोरून नेली. वगैरे फिर्यादी दयानंद हनमंतराव कांबळे, रा. मरखेल ता. मरखेल जि. नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादवरून पोस्टे मरखेल गुरनं 104 / 2022 कलम 379 भादवी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असून तपास पोना / 94 शेख, मो. क्र. 7776067774 हे करीत आहेत,

5 ) दुखापत :

वजिराबाद :- दिनांक 06.06.2022 रोजी 20.00 वा. चे सुमारास, फिर्यादीचे राहते घरी बोरबन फॅक्ट्री, नांदेड येथे, यातील फिर्यादी नमुद नऊ व इतर सात ते आठ अनोळखी आरोपीतांनी गैरकायदयाची मंडळी जमवुन हातात काठया, चाकू खंजर, तलवार घेवून फिर्यादीचे घरात प्रवेश करून हातातील तलवारीचे मुठीने फिर्यादीचे डोक्यात मारुन डोके फोडुन जखमी केले व इतर आरोपीने शिवीगाळ करुन सामानाची नासधुस करून अंदाजे 25000/ रुपयाचे नुकसान करून घर खाली करा नाहीतर जिवे मारण्याची धमकी दिली. वगैरे फिर्यादी शांताबाई बाबुराव वाघमारे, वय 55 वर्षे, व्यवसाय घरकाम रा. बोरबन फॅक्टरी, नांदेड यांचे फिर्यादवरून पोस्टे वजिराबाद गुरन 191/2022 कलम 143,147, 148, 149,324,452,504,506,427 नादवि सह कलम 4/25 भाहका प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपास पोउपनि / श्री आगलावे, मो. नं. 9890630130 हे करीत आहेत.

6 ) विवाहीतेचा छळ :

1 ) धर्माबाद :- दिनांक 10.01.2021 रोजी ते दिनांक 04.06.2022 रोजी पर्यंत फिर्यादीचे सासरी जुना कौठा नांदेड ह.मु. करखेली ता. धर्माबाद जि. नांदेड येथे, यातील फिर्यादी बाईस यातील नमुद चार आरोपीतांनी संगणमत करून फिर्यादीस पैशाची व सोन्याची मागणी करून अश्लिल शिवीगाळ करुन मारहाण केली व शारिरीक, मानसिक छळ केला. व जिवे मारण्याची धमकी दिली. वगैरे फिर्यादी 30 वर्षीय महिला यांनी दिलेल्या फिर्यादवरून पोस्टे धर्माबाद गुरनं 150 / 2022 कलम 498 (अ).294,323,506,34 भादवी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असून तपास पोह / 2036 जाधव, मो. क. 9421841380 हे करीत आहेत.

2 ) नांदेड ग्रामीण :- दिनांक 17.04.2021 रोजी पावेतो, फिर्यादीचे सासरी किवळा ह.मु. रविनगर कौठा नांदेड येथे, यातील फिर्यादी बाईस यातील नमुद तीन आरोपीतांनी संगणमत करून खाजगी व्यवसाय टाकण्यासाठी बँकेतुन पाच लाख रुपये कर्ज काढुन दे असे म्हणुन फिर्यादीचे चारीत्र्यावर संशय करून शिवीगाळ व नारहाण केली तसेच शारिरीक, मानसिक छळ केला. जिवे मारण्याची धमकी दिली. वगैरे फिर्यादी 33 वर्षीय महिला यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे नांदेड ग्रामीण गुरनं 343 / 2022 कलम 498 (अ), 323, 504, 506,34 भादवी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असून तपास पोह / 1133 पेदे, मो.क. 8308999464 हे करीत आहेत.

3) मनाठा :- दिनांक 29.05.2022 रोजी से आज पावेतो, फिर्यादीचे सासरी बरड शेवाळा ता. हदगाव जि. नांदेड येथे, यातील फिर्यादी बाईस यातील नमुद नऊ आरोपीतांनी संगणमत करून घर बांधकाम करण्यासाठी दोन लाख रुपये घेवून ये नाहीतर मी दुसरी बायको करुन घेईन मला तुझी गरज नाही असे म्हणुन शिवीगाळ करून थापडा बुक्याने मारहाण केली तसेच शारिरीक, मानसिक छळ केला. जिवे मारण्याची धमकी दिली. वगैरे फिर्यादी 20 वर्षीय महिला यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे मनाठा गुरनं 103 / 2022 कलम 498 (अ). 494,323,504,506,34 भादवी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असून तपास पोह/ 1694 पवार, मो.क. 9922921694 हे करीत आहेत.

4 ) बिलोली :- दिनांक 17.04.2022 रोजी 00.00 ते दिनांक 20.04.2022 रोजी 11.00 वा. थे दरम्यान, मौजे बिलोली फिर्यादीचे माहेरी कुरेशी गल्ली बिलोली ता. बिलोली जि. नांदेड येथे. यातील फिर्यादी बाईस यातील नमुद सात आरोपीतांनी संगणमत करून माहेरहून दोन लाख रुपये अॅटो घेण्यासाठी घेवून ये नाहीतर म्हणुन शिवीगाळ करून थापडा बुक्याने मारहाण केली तसेच शारिरीक, मानसिक छळ केला. जिवे मारण्याची धमकी दिली. वगैरे फिर्यादी 20 वर्षीय महिला यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे बिलोली गुरनं 143/2022 कलम 498 (अ),323,504,506,34 भादवी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असून तपास पोना / 2542 सोनकांबळे, मो. क. 9822172300 हे करीत आहेत.

5 ) अर्धापूर :- दिनांक 08.102021 रोजी ते दिनांक 22.04.2022 रोजी चे दरम्यान, फिर्यादीचे सासरी मौजे खैरगाव ता. अर्धापूर ह.मु.दिग्रस कोंडुर ता. कळमनुरी जि. हिंगोली येथे यातील फिर्यादी बाईस यातील नमुद सहा आरोपीतांनी संगणमत करून तुला मुलगा होत नाही कुळाला वारीस नाही. दुकान धंद्यासाठी तुझ्या बापाकडुन दीड लाख रुपये आणुन दे व मला दुसरे लग्न करण्याची परवानगी दे असे म्हणुन शिवीगाळ करुन मारहाण केली तसेच शारिरीक, मानसिक छळ केला. जिवे मारण्याची धनकी दिली. वगैरे फिर्यादी 25 वर्षीय महिला यांनी दिलेल्या फिर्यादवरून पोस्टे अर्धापूर गुरनं 156 / 2022 कलम 499 (अ),323,504,506,34 भादवी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असून तपास पोह/ 2241 तोरणे, मो.क. 7745047777 हे करीत आहेत.

7 ) फसवणुक :

1 ) उस्माननगर :- दिनांक 20.06.2022 रोजी ते दिनांक 25.12.2022 रोजी चे दरम्यान, मौजे चिखली ता. कंधार जि. नांदेड येथे, यातील नमुद आरोपीने फिर्यादीची ओळख झाल्यावर मी धन धन पायाळ आहे माझ्याकडे जमिनीतुन मिळालेले भरपुर सोने आहे पण माल सराफा दुकानात एकदाच सोने विकता येत नाही त्यामुळे मी तुम्हाला मार्केट रेट पेक्षा अर्ध्या किमतीत सोने देतो असे सांगुन खरे सोने म्हणुन पाच तोळ्याचे नकली बिस्कीट दिले व फोन में च्या वेगवेगळ्या नंबर वर फिर्यादी कडुन ऑनलाईन एकुण 99,000 /- रुपये घेवून व खरे सोने म्हणुन नकली सोने देदून 99000 /- रुपयांची फसवणुक केली. वगैरे फिर्यादी प्रेमा गणपतराव पवळे, वय 50 वर्षे, व्यवसाय शेती रा. चिखली ता. कंधार जि.नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे उस्माननगर गुरन 117 / 2022 कलम 420 नादवि कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपास सपोनि / श्री देवकत्ते मो.नं. 9307343434 हे करीत आहेत.

2 ) विमानतळ :- दिनांक 03.06.2022 रोजी 16.00 वा. चे सुमारास, सुंदरनगर साईबाबा मंदीराजवळ,हनुमानगड नांदेड येथे यातील नमुद आरोपीने फिर्यादीचे मोबाईल वर कॉल करुन मी रुपेश पंडीलवार बोलतो अशी तोतयेगिरी करुन पंडीलवार मोबाईल शॉपीचे नावाने सॅमसंग एस 22 अल्ट्रा मोबाईल किंमती 1.10,000/- रुपयाचा मोबाईल घेवून जावून फसवणुक केली. वगैरे फिर्यादी सोहन लक्ष्मणराव मेकलवार वय 32 वर्षे, व्यवसाय मोबाईल शॉपी रा सुंदरनगर साईबाबा मंदीराजवळ, हनुमानगड नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे विमानतळ गुरन 196 / 2022 कलम 419,420 भादवि कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपास सपोनि / श्री गिते, मो. नं. 7387791899 हे करीत आहेत. 8 ) भारतीय हत्यार कायदा :

इतवारा :- दिनांक 07.06.2022 रोजी 13.10 वा. चे सुमारास, गाडीपुरा येथील लिबर्टी टॉकीज जवळ नोकळया जागेत, नांदेड येथे, यातील नमुद आरोपीने आपले ताव्यात विनापरवाना बेकायदेशीर रित्या लोखंडी खंजर किंमती 100/- रूपयाचे ताब्यात बाळगलेला मिळुन आला. वगैरे फिर्यादी पोना / 2557 शिवानंद बालाजी हंबर्डे, ने. पोस्टे इतदारा यांनी दिलेल्या फिर्यादवरून पोस्टे इतवारा गुरनं 140 / 2022 कलम 4 / 25 भारतीय हत्यार कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असून तपास पोना / 1218 मठपती, मो. क्र. 02462-236510 हे करीत आहेत.

9) प्रोव्हिबीशन :

मांडवी :- दिनांक 07.06.2022 रोजी 18.10 वा. चे सुमारास, मौजे जावरला आरोपी बाईचे घरी ता. किनवट जि. नांदेड येथे, यातील नमुद आरोपीने बिना परवाना बेकायदेशिररित्या गावठी हातभट्टी दारु किंमती 3000 /- रुपयाचा नाल चोरटी विकी करण्याचे उद्देशाने ताब्यात बाळगलेली मिळुन आली. वगैरे फिर्यादी मपोना / 1366 माला परशुराम कन्नाके, ने. पोस्टे मांडवी यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे मांडवी गुरनं 46 / 2022 कलम 65 (ई) न. प्रो. कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपास पोना / 29 सत्यपाल मडावी, मो. क्र. 9422116433 हे करीत आहेत.

जनसंपर्क अधिकारी पोलीस अधिक्षक कार्यालय, नांदेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *