मृगाच्या आरंभी वरुणराजा ची फुलवळ सह कंधार तालुक्यात दमदार हजेरी…

फुलवळ ( धोंडीबा बोरगावे )

८ जून म्हणजेच मृग नक्षत्रा चा आरंभ , चातक पक्षा प्रमाणे शेतकरीराजा पावसाची वाट पाहत असतांनाच आज बुधवार दि.८ जुन रोजी सायंकाळी ६:३० वाजेच्या दरम्यान फुलवळ सह परिसरात मृगाच्या पहिल्याच दिवशी वरूणराजाने दमदार हजेरी लावल्याने सर्वत्र नवचैतन्य निर्माण झाले असून बळीराजाच्या चेहऱ्यावर आनंदी आनंद दिसून येत होता तर पहिल्या पावसात चिंब होण्यासाठी अनेकांनी पावसात जाऊन आनंदोत्सव साजरा केला.

   


    बहुतांश प्रमाणात शेतीमशागतीची पेरणीपूर्वी कामे आटोपून शेतकरी पेरणी च्या तयारीत सज्ज झाला असला तरी आजही अनेक ठिकाणी पेरणीपूर्वी मशागतीची कामे अपूर्ण च आहेत. मृगाच्या पहिल्या दिवशी वरूणराजाने लावलेली हजेरी म्हणजे शेतकऱ्यांना एकप्रकारची चेतावणी च असल्याचे दिसून येत असून , शेतकऱ्यांनी उर्वरीत कामे तात्काळ पूर्ण करण्यासाठी चा इशारा समजून आवश्यक आहे.








    आता बी बियाणे , खते खरेदीसाठी बाजारात लवकरच गर्दी होणार या आशेने कृषी सेवा केंद्र चालक समाधान व्यक्त करत आहेत. 

    काळेभोर ढग , सोसाट्याचा वारा आणि विजांच्या गडगडाटासह मृगाच्या पावसाने लावलेल्या हजेरी ने सर्वत्र समाधानकारक वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *