गऊळ
शंकर तेलंग
कंधार ; प्रतिनिधी
विद्यालयातील बारावी विज्ञान शाखेचा 100 टक्के निकाल लागला असून या शाखेतून कु . अस्मिता तानाजी वडजे प्राप्त गुण 554( 92 .33 टक्के) ,अंकुश सोनबा मुंडकर प्राप्त गुण 533 (88 .83 टक्के ), कु. मंजुळा सुग्रीव केंद्रे प्राप्त गुण 530(88.33 टकके) यांनी गुणानुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला आहे .
वाणिज्य शाखेचा निकाल 98 टक्के लागला आहे , या शाखेतून कु . शिवकन्या शंकर वडजे प्राप्त गुण 534 (89 टक्के) ,कु . अदिती प्रल्हाद गायकवाड प्राप्त गुण 533 (88 .83 टक्के) , कु . श्वेता व्यंकटी वडजे प्राप्त गुण 526 (87.66 टक्के) यांनी गुणानुक्रमे प्रथम , द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला आहे .
कला शाखेचा निकाल 98 टक्के लागला असून या शाखेतून कु .पल्लवी लक्ष्मण केंद्रे प्राप्त गुण 530 (88 33 टक्के) , कु . नेहा आनंदराव वाघमारे प्राप्त गुण 525(87.50 टक्के) , कु . तेजस्विनी दिगांबर केंद्रे प्राप्त गुण 515(85.83) यांनी गुणानुक्रमे प्रथम , द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला आहे.
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा मा.जि.प .सदस्य श्री .मनोहरराव बापुराव पा .तेलंग , श्री डॉ. श्याम बापुराव पा. तेलंग, बालाजीराव पा .वडजे ,कर्मवीर इंग्लिश स्कूलचे संचालक प्रा .डॉ .सुरेश तेलंग , विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एस .एम .गिरे पर्यवेक्षक श्री एस .आर मुंजेवार ,परीक्षा विभाग प्रमुख श्री बी .डी हिवरे , विषय शिक्षक श्री आर .एस. शिंदे व श्री मुस्तफा पठाण , सर्व शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.