महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखाधिकारी यांच्या अडमुठे वागण्यामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांरी वैतागले ; कंधार शाखाधिकारी यांच्या विरोधात उपोषणाचा इशारा

कंधार – ९/६/२०२२


कंधार – तालुक्यातील अंदाजे ६००ते ७०० सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र ग्रामीण बँकेतर्फे सेवानिवृत्त वेतन अदा करण्यात येते. नुतन आलेले शाखाधिकारी सहकार्य करीत नसल्याने वेळेवर वेतन अदा होत नसल्याने कर्मचारी हैराण झाले आहेत व वेतागले आहेत.


सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आपल्या उर्वरित आयुष्यासाठी शासन निवृतीवेतन अदा करते. त्यावर ते आपल्यासाठी व कुंठूबासाठी औषधोपचार करतात. काही जणांना तर आपल्या कुटुंबियाचा रहाटगाडा चालवावा लागतो.प्रसंगी तिर्थयात्रेसह पत्नीला आधार द्यावा लागतो. महिन्यातील एक तारीख केव्हा येते ? याच्याकडे त्याचे सततचे लक्ष असते. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व अकाउंट हे नियमितपणे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची अडचण लक्षात घेऊन वेळेत बिल करतात. ज्या बँकेत खाते आहेत तिकडे चेक पाठविला जातो. पण त्यातील महाराष्ट्र ग्रामीण बँकत दर महिन्यात चेक पाठविला जातो.सहा महिन्यापूर्वी नुतन आलेले शाखाधिकारी जाणीवपूर्वक वेतन अदा करण्वयास दिरंगाई करतात. विचारणा केली तर वरीष्ठांना चेक पाठविला आहे.

रक्कम जमा होईल तेव्हा वेतन अददा करतो अशी कुठलीही कारणे सांगून वेतन देण्यास टाळाटाळ करत आहेत. यामुळे ग्रामीण भागातील वयोवृद्ध सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना बँकेत हेलपाटे मारावयास लावतात पर्यायाने त्याचे आर्थिक नुकसान होते. याबाबत सेवानिवृत्त संघटनेचे सचिव शंकर गोरे, कोषाध्यक्ष वाघमारे, सखारामपंत कुलकर्णी, के. के. स्वामी, डी. के. मोठभरे, डी. आर. झुंजुरवाड, भिकाजी ढवळे, मुख्तार यांनी गटविकास अधिकारी मांजरमकर,अकाउंट गडपल्लेवार, धोंडगे यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी बँक शाखाधिकारी यांच्याशी संपर्क साधून लवकरात लवकर सेवानिवृत्त वेतन देणायाचे आदेश दिले. यावेळी संघटनेने यापुढे शाखाधिकारी यांचे असेच वर्तन राहिल्यास बँकेपुढे उपोषणाचा लेखी इशारा दिला आहे.

प्रतिक्रिया

कंधार येथिल स्टेट बॅक ऑफ इंडीया आम्हास सहकार्य करत नाही . दरवर्षी पगारीसाठी SBI कडे चेक जमा करण्यासाठी दिला जातो त्याप्रमाणे यावेळेसपण दिला मात्र SBI कंधार शाखेने कामासाठी कर्मचारी नाहीत अस सबबी देवून चेक वापस केल्याने आम्ही तो चेक आम्ही  नांदेड शाखेकडे पाठवला आहे . चेक जमा झाल्यावर तात्काळ सेवानिवृत्त कर्मचार्याचे वेतन अदा हाईल. आमच्या कडून सर्वच प्रकारे सेवानिवृत्त कर्मचार्याना सहकार्य होते व यापुढेपण राहील.

डी.डी. आरेकर ,
बॅक शाखा व्यवस्थापक , महाराष्ट्र ग्रामिण बॅक कंधार


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *