अहमदपुर ( प्रा भगवान आमलापुरे )
कार्यक्रमाच्या सुरुवातीला आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.मान्यवरांच्या हस्ते विविध १२ फुलं आणि फळांची रोपं लावण्यात आली. व्यासपीठावरील सर्वांनी व्रक्षलागवडीचे महत्त्व पटवून सांगितले आणि शाहीर सुभाष साबळे आणि खाडे सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
यात शेषराव ससाणे – झाड आँक्सिजन देणारा कारखाना आहे. मुख्याध्यापक मदने – झाडाअभावी जागतिक तापमानात वाढ आणि अगतिक मानव जात. एन डी राठोड – एक व्रक्ष लावून तो जोपासने म्हणजे १० पुत्राचे पालनपोषण. वर्षा माळी यांनी झाडाचे संतांनी सांगितलेले महत्त्व विषद केले आणि सुभाष साबळे आणि खाडे सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सुत्रसंचालन बालाजी वाघमारे यांनी तर आभार प्रा भगवान आमलापुरे यांनी मानले.
दुसऱ्या सत्रात बा ह वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रीतांचे कवीसंमेलन पार पडले.प्रा प्रफुल्ल धामणगावकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यात एन डी राठोड, वर्षा माळी, आयोजक सुभाष साबळे आणि प्रा भगवान आमलापुरे सहभागी होते. सुत्रसंचालन प्रा पांडुरंग कांबळे यांनी केले. प्रभाकर कांबळे सरनी आभार मानले. शेवटी मुंजाजी गवळे,शेषराव ससाणे,सुभाष साबळे, प्रभाकर कांबळे, सौ वर्षा गवळे आणि इप्पर सर यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.अमित साबळे, प्रेम वाघमारे, दगडू ढवळे आणि सुरज कांबळे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.