शिवराज पाटील धोंडगे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सचिव पदी निवड ; जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते सन्मान

कंधार ; दिगांबर वाघमारे

जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते प्रदेश सचिवपदी शिवराज पाटील धोंडगे यांची आज गुरुवार दिनांक ८ जुन रोजी मुंबई येथे निवड करण्यात आली आहे .

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब भाई शेख यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती . शेतकरी नेते तथा माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांचे जेष्ठ चिरंजिव शिवराज पाटील धोंडगे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस ची विशेष जबाबदारी राष्ट्रवादी पक्षाने टाकली असल्याने त्यांचे सर्वत्र कौतूक होत आहे .

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आदरणीय ना. श्री. जयंतराव पाटील साहेब यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या प्रदेश सचिव पदी नियुक्ती झाली असून आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचारानुसार पुढील काळात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या माध्यमातून सर्वसामान्य युवकांच्या विकासात भरीव कार्य करीत पक्ष संघटना मजबुतीने उभी करण्यासाठी
युवा नेते शिवराज पाटील धोंडगे कटीबद्ध असल्याचे अश्वासन त्यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *