प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल अपशब्द वापरुन मुस्लीम धर्मियांच्या भावना दुखावल्याप्रकरणी कंधार येथे निषेध

कंधार ; प्रतिनिधी

प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल अपशब्द वापरुन मुस्लीम धर्मियांच्या भावना दुखावल्याप्रकरणी कंधार येथे आज शुक्रवार दि.१० जुन रोजी सर्व मुस्लीम बांधवाच्या वतीने तहसिलदार कंधार यांना निवेदन देवून निषेध करण्यात आला आहे तसेच
भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि नवीन जिंदल व त्यांचे विधान प्रसारित करणारी वृत्तवाहिनी यांच्यावर कडक कायदेशीर कार्यवाही करुन अटक करण्याची मागणी करण्यात आली .

सर्व मुस्लीम बांधव कंधार जि. नांदेड यांच्या वतीने तहसिलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात असे नमूद केले की भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि नवीन जिंदल यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल अवमानकारक शब्द वापरुन त्यांचा अपमान केला आहे. यामुळे समस्त मुस्लीम धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.

नुपूर शर्मा व नवीन जिंदल यांनी हे कृत्य जाणीवपूर्वक केलेले असून ते समाजामध्ये तेढ निर्माण करणारे आहे. तसेच संबंधित वृत्तवाहिनीने हे वृत्त जाणीवपूर्वक प्रसारित करुन त्याचा प्रसार केला आहे. त्यामुळे नुपूर शर्मा आणि नवीन जिंदल व सदरील वृत्तवाहिनीवर गुन्हा नोंद करुन कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

सदरील अवमानकारक शब्द वापरणाऱ्या नुपूर शर्मा आणि नवीन जिंदल व प्रसारित करणारी वृत्तवाहिनीवर कडक कायदेशीर कार्यवाही करुन नुपूर शर्मा व नवीन जिंदल यांना अटक करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली . यावेळी मुस्लीम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *