मुंबई दि.12.06.2022 वीर शैव लिंगायत समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक ,आर्थिक व संघटनात्मक विकास होण्यासाठी कलात्मक, समाजप्रबोधन व साहित्यिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या कलावंत ,साहित्यिक समाज प्रबोधन कार, समाज संघटक , समाजसेवक असलेल्या एका व्यक्तीला व यासाठी कार्य करणाऱ्या एका संस्थेला महात्मा बसवेश्वर यांच्या नावाने त्यांच्या जयंतीदिनी महात्मा बसवेश्वर सामाजिक समता शिवा पुरस्कार देण्यात येतो.
दिनांक 13 रोजी या पुरस्काराचे उद्घोषणा महाराष्ट्र शासनाच्या।
प्रसिद्धी पत्रकान्वये करण्यात आली आहे.
त्यात 2016-2017 चा व्यक्ती ला असलेला पुरस्कार औरंगाबादचे शिवा संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांना तर संस्थेचा शिवा संघटना यांना, 2017 -2018 चा व्यक्तीला असलेला पुरस्कार नागपूरचे सामाजिक कार्यकर्ते अभय मनोहरराव कल्लावार यांना,
तर संस्थेचा वीर मठ संस्थान अहमदपूर जिल्हा लातूर यांना, सन 2018 -2019 व्यक्ती चा पुरस्कार नांदेडचे सामाजिक कार्यकर्ते श्री विठ्ठल बळीराम ताकबीडे यांना तर सन 2019-2020 व्यक्ती चा पुरस्कार पुण्याचे सामाजिक कार्यकर्ते श्री उमाकांत गुरुनाथ शेटे यांना तर संस्थेचा महात्मा बसवेश्वर सेवाभावी संस्था फुलकळस तालुका पूर्णा जिल्हा परभणी यांना ,सन 2019-2020 व्यक्ती चा पुरस्कार लातूरचे सामाजिक कार्यकर्ते रामलिंग बापूराव तत्तापुरे यांना तर संस्थेचा तीर्थक्षेत्र आधीमठ संस्थान धारेश्वर तालुका पाटण जिल्हा सातारा यांना ,2021-2022 व्यक्ती चा पुरस्कार नवी मुंबईचे सामाजिक कार्यकर्ते डॉ. यशवंत बाबाराव सोनटक्के यांना तर संस्थेचा नांदेडच्या सारथी प्रतिष्ठान यांना घोषित करण्यात आला आहे.
या पुरस्काराचे स्वरूप व्यक्तीला पंचवीस हजार रुपये रोख, संस्थेला 51 हजार रुपये रोख, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ आणि पुष्पहार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान केला जाणार आहे.
सदरचा पुरस्कार वितरण सोहळा शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीने जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या 891 व्या जयंती दिपंधरवाडा च्या भव्य समारोप समारंभ आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणार्या महात्मा बसवेश्वर सामाजिक समता शिवा पुरस्काराचे वितरण सोहळा मुंबई येथे दि. 17 रोजी शुक्रवारी सकाळी दहा वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभाग्रहात होणार आहे.
या पुरस्कार सोहळ्याचे वितरण प्रमुख मार्गदर्शक महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धवजी ठाकरे राहणार असून या सोहळ्याचे उद्घाटन उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. अशोकराव चव्हाण ,पाटबंधारे मंत्री ना. जयंतराव पाटील ,ग्रामविकास मंत्री ना. हसन मुश्रीफ ,ओबीसी मंत्री ना. विजय वडेट्टीवार, ओबीसी राज्यमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती राहणार असून या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी शिवा संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांची उपस्थिती राहणार आहे.
या सोहळ्याला उपस्थित राहावे असे जाहीर आव्हान शिवा संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवशरण पाटील, राज्य उपाध्यक्ष वैजनाथ तोंडसुरे, राज्य सरचिटणीस धन्यकुमार शिवणकर, राज्य उपाध्यक्ष शैलेश जाकापुरे ,राज्य सरचिटणीस रुपेश होनराव, राज्य उपाध्यक्ष भीमाप्पा खांदे ,राज्य उपाध्यक्ष सुनील वाडकर, राज्या चिटणीस सात लिंग स्वामी ,राज्य चिटणीस किशनराव इमडे यांनी केले आहे.