माणिक प्रभू विद्यालयाचे यश 150 पैकी 150 विद्यार्थी उत्तीर्ण


गऊळ
शंकर तेलंग

आंबुलगा , ता कंधार,

  दहावी बोर्ड परीक्षेत माणिक प्रभू विद्यालयाने घवघवीत यश संपादन करत ,आपली उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे . विद्यालयातून परीक्षा दिलेल्या एकुण 150पैकी 150 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यालयाचा एकुण निकाल 100 टक्के लागला आहे.
  या परीक्षेत किरण ज्ञानेश्वर पवळे 484 (96.80 टक्के )गुण घेऊन  विद्यालयातून प्रथम आला आहे . कु.उप्पे सानिका दत्ता 447 (94.80 टक्के) गुण घेऊन द्वितीय आली आहे तर     वैभव शंकर स्वामी व  कु .रोहित सुरेश केंद्रे 470 ( 94 टक्के ) गुण घेऊन तृतीय आले आहेत .
                      सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा मा.जि.प .सदस्य श्री मनोहरराव बापुराव पा .तेलंग ,श्री डॉ.श्याम बापुराव पा. तेलंग, बालाजीराव पा .वडजे ,कर्मवीर इंग्लिश स्कूलचे संचालक प्रा .डॉ .सुरेश तेलंग , विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एस .एम .गिरे पर्यवेक्षक श्री एस .आर मुंजेवार  व सर्व शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *