फुलवळ च्या श्री बसवेश्वर विद्यालय चा १०० टक्के निकाल..तिन्ही क्रमांकावर मुलींनी मारली बाजी.

श्रद्धा साके ने ९६.४०% गुण मिळवून प्रथम , शिवानी मंगनाळे ने ९५.४०% गुण घेऊन द्वितीय तर साक्षी साके ने ९४.२० % गुण प्राप्त करून तिसरा क्रमांक पटकावला.

फुलवळ ( धोंडीबा बोरगावे )

   नुकताच एसएससी बोर्ड शालांत परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून कंधार तालुक्यातील फुलवळ येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचा १००% एवढा निकाल लागल्याने विद्यार्थ्यांसह पालक व गुरुजनांत आनंदाचे वातावरण निर्माण होऊन समाधान व्यक्त केले जात आहे.

     शाळेतून सर्वप्रथम येण्याचा मान श्रध्दा नामदेवराव साके हिने ९६.४०% गुण मिळवून प्राप्त केला आहे तर द्वितीय येण्याचा शिवानी बसवेश्वर मंगनाळे ने ९५.४०% गुण मिळवून घेतला असून साक्षी नामदेवराव साके ने ९४.२० % गुण प्राप्त करून तिसरे स्थान पटकावले आहे.

  सदर शाळेतुन एकूण विद्यार्थ्यांपैकी ९० टक्के चा टप्पा ओलांडणारे १० विद्यार्थी आहेत. त्यात आयशा निश्चलकर ९४% , महेश बसवंते ९३.८०% , बस्वराज बसवंते ९३% , ओमकार मुंडकर ९३% , उमाकांत फुलवळे ९२.८०% , दीपक हात्ते ९१.२०% , मनोज डांगे ९१.२०% , श्रुती शेंबाळे ९०.४०% , अस्मिता गोरे ९०% , प्रगती पांचाळ ९०% असे १० विद्यार्थी मानकरी ठरले. 

 सदर शाळेतून एसएससी बोर्ड परीक्षेसाठी एकूण ५८ विद्यार्थी बसले होते त्यापैकी सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

या सर्व विद्यार्थ्यांचे शाळेचे अध्यक्ष वैजनाथराव सादलापुरे , सेवानिवृत्त कृषी अधिकारी विश्वांभरराव मंगनाळे , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बसवेश्वर मंगनाळे , मुख्याध्यापक बी एन मंगनाळे , वर्गशिक्षक चंद्रकांत फुलवळकर , संपुर्ण शिक्षक , शिक्षिका , शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *