जयंती ढवळे हिचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

प्रतिनिधी, कंधार

तालुक्यातील कुरुळा येथील साहित्यिक, समीक्षक प्रज्ञाधर ढवळे यांची कन्या जयंती ढवळे हिने यावर्षी दहावी बोर्ड परीक्षेत ९७.२० टक्के इतके गुण मिळवून घवघवीत यश मिळवले आहे. कुरुळा येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत प्राथमिक शिक्षण घेऊन सन २०२२ मध्ये नांदेड येथील लिटल स्काॅलर्स पब्लिक स्कूलमधून जयंती ढवळे हिने द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. या यशाचे श्रेय तिने आई-वडील प्रज्ञाधर ढवळे आणि पंचफुला वाघमारे, तसेच शाळेतील मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षिका यांना दिले आहे.


या यशाबद्दल प्रख्यात विचारवंत डॉ.यशवंत मनोहर, यशदाचे प्रशिक्षण अधिकारी डॉ.बबन जोगदंड, डॉ.हेमंत कार्ले, डॉ.राम वाघमारे, प्रशांत वंजारे, अनुरत्न वाघमारे, विद्रोही कवी राजेंद्र कांबळे, प्रफुल्ल धामणगावकर, सुमेध घुगरे, संजय मोखडे, राजेश्‍वर कांबळे, विरभद्र मिरेवाड, भैय्यासाहेब गोडबोले, मारोती कदम, कैलास धुतराज, शंकर गच्चे, मारोती कदम, सुभाष लोखंडे, रुपाली वागरे-वैद्य बाबुराव पाईकराव, रणजीत गोणारकर, नागोराव डोंगरे, कपिल मुळे, आनंद गोडबोले, पुरुषोत्तम संबोधी आदींसह अनेकांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *