आज फादर्स डे म्हणजे वडिलांचा दिवस खरं पाहिलं तर वडिलांचा दिवस म्हणजे प्रत्येक दिवस असतोच असतो. पण काळ बदलला वेळ बदलला आणि वडिलांचा दिवस यायला लागला ह्यालही भाग्यच म्हणावे लागेल कारण की, काबाड कष्ट करून मुले ,पत्नी ,आई ,वडील, भाऊ बहीण ,सोयरे या सर्वांचे नाते जोडून ठेवणारा एकमेव नाते म्हणजे वडील होत. मुलांना किंवा संसारात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आधार हा कर्त्या पुरुषाचा असतो आणि तो कर्ता पुरुष म्हणजे वडील आहेत. मुलांची कुठलीच आशा न ठेवता त्यांच्यासाठी अहोरात्र ऊन ,पाऊस, वारा याची तमा न बाळगता ते कसे आनंदित राहतील यासाठी जगातील मान ,सन्मान ,काम पडले तर आपमान सहन करण्याची ताकद फक्त वडीलातचअसते.
काही भूमिका वडिलांच्या ताठर असतात .वडिलांनी दिलेला मार हा आयुष्याच् पुढील पाऊल खुणा असतात. पण वडिलांनी बोललेलं केलेलं कुठलेही चांगला आणि वाईट त्यांनी अनुभवलेलं असते. वडिला बाबतीत लिहायला पुस्तके अपुर पडतो. अशा माझ्या देवासमान बापाला माझा मानाचा दंडवत.
ओंकार लव्हेकर, कंधार.